हत्तींचा कळप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्तींचा कळप
हत्तींचा कळप

हत्तींचा कळप

sakal_logo
By

L23003

ओळ - घोटगेवाडी ः येथील उमेश पांगम यांच्या माडबागेचे हत्तींनी नुकसान केले.

हत्तींचा कळप
घोटगेवाडीत
साटेली भेडशी ः मोर्लेमध्ये गेले काही दिवस मुक्कामाला असलेला हत्तींचा कळप बुधवारी (ता. 18) रात्री घोटगेवाडीत पोहोचला. तेथे त्यांनी अनेक कवाथे आणि माडांचे नुकसान केले. केर, मोर्ले येथे पाच हत्तींच्या कळपाचा बरेच दिवस वावर होता. तो कळप पाळयेत जाणार की घोटगेवाडीकडे परतेल, याबाबत अंदाज बांधण्यात येत होते. अखेर कळपाने काल रात्री घोटगेवाडी गाठली. रात्री नऊच्या दरम्यान तेथील उमेश पांगम यांच्या माड बागायतीत घुसून सहा-सात कवाथे व माडांचे नुकसान केले. तत्पूर्वी हत्तींनी मोर्ले येथील संतोष मोर्ये यांच्या केळीबागेचे नुकसान केले. तसेच सचिन धुमास्कर यांच्या बांबू बेटांचेही नुकसान केले.
-----------

L23004
ओळ - उमेश पेंडुरकर

पेंडुरकर यांना पुरस्कार जाहीर
साटेली भेडशी ः कोचरा पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुधन पर्यवेक्षक उमेश पेंडुरकर यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जागतिक पशुवैद्यक दिन 2016 करिता पशुसंवर्धन विभागातील गुणवंत पशुवैद्यकांना पुरस्कार प्रदान करणे अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक या स्वर्गामध्ये गुणवंत पशुवैद्यक पुरस्काराकरिता पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या (ता. 20) सकाळी 11 वाजता शरद पवार सभागृह, जिल्हा परिषद, पुणे येथे पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी पत्र डॉ. धनंजय परकाळे यांनी श्री. पेंडुरकर यांना लेखी स्वरुपात दिले आहे. श्री. पेंडुरकर यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये पशुधन पर्यवेक्षक म्हणून काम करताना चांगल्या पद्धतीने काम केले आहे. या कामाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. याबाबत विविध राजकीय पदाधिकारी, जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी वर्ग, कृषी अधिकारी, सर्व सहकारी कर्मचारी यांनी श्री. पेंडुरकर यांचे अभिनंदन केले.
.................

देवगडात ढगाळ वातावरण
देवगड, : तालुक्यात आज ढगाळ वातावरण तयार झाले होते. सकाळी अधूनमधून हलका पाऊस झाला. मात्र पावसात जोर नव्हता. आता मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागली आहे. गेले काही दिवस उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच आज सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. अधूनमधून हलका पाऊस झाला. पावसाच्या शक्यतेने आंबा बागायतदारांची धांदल झाली होती. सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते.
...........