नांदगाव उड्डानपुलास पर्यायी मार्ग द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगाव उड्डानपुलास पर्यायी मार्ग द्या
नांदगाव उड्डानपुलास पर्यायी मार्ग द्या

नांदगाव उड्डानपुलास पर्यायी मार्ग द्या

sakal_logo
By

L23022

- नांदगाव ः येथे महामार्ग चौपदरीकरण कामाची पाहणी करताना नितेश राणे. सोबत ठेकेदार कंपनीचे श्री. पांडे, हायवे प्राधिकरण अधिकारी जाधव, पोलिस निरीक्षक हेमंत हुलावले, मिलिंद मेस्त्री, आफ्रोजा नावलेकर, पंढरी वायंगणकर आदी.


नांदगाव उड्डानपुलास पर्यायी मार्ग द्या
नितेश राणे ः महामार्ग चौपदरीकरण कामाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १९ ः येथील उड्डाण पुलाच्या बाजूने जोपर्यंत सेवा रस्ता पूर्ण होत नाही, तोपर्यंत श्री देव कोळंबा येथे मिडलकट ठेवून पर्यायी मार्ग द्या, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकऱ्यांना केल्या. येथील महामार्गाच्या अर्धवट कामाची त्यांनी पाहणी केली. पावसाळ्यात ज्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे तेथे तातडीने काम करा, मागणी नसताना गतिरोधक का घातले? असा संतप्त सवालही त्यांनी केला. यापुढे असले प्रकार खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गावरील येथील उड्डाण पुलावर मंगळवारी (ता.१७) रात्री दुचाकीवरून कोसळून बांदिवडे खुर्दच्या पोलीस पाटील रसिका रमेश तोरसकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आक्रमक झालेल्‍या नांदगांववासीयांनी एकत्र येऊन उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन केले होते. हा अपघात अचानक घातलेल्या गतिरोधकामुळे झाला होता. त्यानंतर या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी नांदगाव पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची कणकवली प्रांत कार्यालयात बैठक झाली होती. त्या बैठकीनुसार आज आमदार राणे यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता जाधव, श्री. पांडे, उप अभियंता कुमावत, ठेकेदार कंपनी अधिकारी, पोलिस निरीक्षक हेमंत हुलावले, पोलीस हवालदार मंगेश बावधाने, श्री. इंपाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, असलदे उपसरपंच संतोष परब, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कमलेश पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, भुषण म्हसकर, भुपेश मोरजकर उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, "नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवून महामार्ग प्राधिकरणाने प्रवाशांना अपघाताचे आमंत्रण दिलेले आहे. उड्डाण पुलाच्या बाजूने जोपर्यंत सेवा रस्ता पूर्ण होत नाही, तोपर्यंत श्री देव कोळंबा येथे मिडलकट ठेवून पर्यायी मार्ग द्या. ज्यांची घरे, जमिनी भूसंपादनात गेली आहेत, त्यांचा मोबदला तातडीने देण्यासाठी गतीने काम करा. दोन-चार महिने नोटीस पोचण्यासाठी का वेळ लागतो याचे आत्मपरीक्षण महसूल विभागाने करावे. प्राथमिक शाळेत येणाऱ्या मुलांसाठी महामार्ग कसा ओलांडावा? याचे नियोजन करा. पर्याय काय असेल तो द्या. ब्रिजवर विजेच्या गंभीर समस्या निर्दशनास आल्या आहेत. त्या तत्काळ पूर्ण करा."

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59712 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top