
चिपळूण ः स्ट्रेज गॅलरी फोडल्याने शिवनदीच्या पात्रातील पाणी थेट जॅकवेलमध्ये
( या बातमीशेजारी 7 नंबरची बातमी घ्यावी.)
......
-rat19p40.jpg
23016
ः मिरजोळी बायपासजवळ असलेल्या जॅकवेलचे दूषित पाणी.
-------------
जॅकवेलचे पाणी प्रदूषित; रहिवाशी संतप्त
मिरजोळीतील स्ट्रेज गॅलरी फोडल्याने नदीतील पाणी थेट जॅकवेलमध्ये; तक्रारीनंतर ग्रामपंचायतीला जाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः- शहरालगत असलेल्या मिरजोळी गावातील खेंड महालक्ष्मी नगर हे शहराच्या सिमेवर वसलेले आहे. या नवीन वसाहतीला मिरजोळी ग्रामपंचायतीच्या शिवनदी काठावर असलेल्या बायपासजवळील जॅकवेलमधून पाणीपुरवठा होतो; परंतु शिवनदीतील गाळ काढताना या जॅकवेलच्या स्ट्रेंज गॅलरीचा पाइप फुटला. तेथील बांधकामही तुटल्याने नदीचे पाणी थेट जॅकवेलमध्ये जात असल्याने जॅकवेलचे पाणी दूषित झाले असून त्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांची धरण उशाला कोरड घशाला, अशी स्थिती झाली आहे.
बुधवारी (ता. १८) संतप्त महिला व रहिवाशांनी जॅकवेलवर धडक दिली. मिरजोळी ग्रामपंचायतीने महालक्ष्मी नगरसाठी ११ नळजोडण्यांसाठी ही जॅकवेल जलस्वराज्य योजनेतून बांधली होती. या विहिरीला पुरेसे पाणी नसल्याने त्या वेळी शिवनदीतून स्ट्रेंज गॅलरी बांधून पाण्याची जॅकवेलमधील आवक वाढवण्यात आली. येथे आता ५० पेक्षा जास्त जोडण्या आहेत. या जॅकवेलवरून महालक्ष्मीनगर नवीन वसाहत व ताजा बाजारपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. या विहिरीत मासे मेल्याने दुर्गंधी येत असावी, असा ग्रामस्थांचा समज झाला. काही दिवस गेल्यावर ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकांना हे कळवले. प्रथम याबाबत उडवउडवी करण्यात आली. पाणीपट्टी वेळेवर लोक भरत नसल्याने अडचणी आहेत. काहींची ८ ते १० वर्षे पाणीपट्टी थकित आहे; पण जे नियमित पाणीपट्टी भरतात त्यांच्यावर ग्रामपंचायत अन्याय का करते, असा लाभार्थींचा सवाल आहे.
...
चौकट
स्वच्छ पाण्याचा पुरवठा करा
ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार पाणी उपसण्यासाठी ग्रामपंचायतीने पंप लावला. पाणी अर्धे उपसल्यावर स्ट्रेंज गॅलरीतून नदीचे दूषित गढूळ पाणी वेगाने जॅकवेलमध्ये येत असल्याचे निदर्शनास येताच लाभार्थी खवळले. नदीच्या पाण्यामुळेच जॅकवेलचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे जमलेल्या नागरिकांनी स्ट्रेंज गॅलरी पूर्ववत केली आहे. स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली.
-------
चौकट
पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी प्रयत्न ; दलवाई
सरपंच कासम दलवाई यांच्याशी संपर्क साधला असता नाम फाउंडेशनने गाळ काढताना स्ट्रेंज गॅलरी उघडी झाल्याने नदीचे पाणी जॅकवेलमध्ये जात आहे. आपण याबाबत संबंधितांशी संपर्क साधून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.
----------------------