तिलारीत भरपावसात रस्तादुरुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिलारीत भरपावसात रस्तादुरुस्ती
तिलारीत भरपावसात रस्तादुरुस्ती

तिलारीत भरपावसात रस्तादुरुस्ती

sakal_logo
By

L२३०१७

- तिलारी ः खड्डे बुजवण्याचे काम भर पावसात सुरू आहे.

तिलारीत भरपावसात रस्तादुरुस्ती
ग्रामस्थांमध्ये संताप ः दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. १९ ः तिलारी ते मुळस खरारी दरम्यान खड्डे बुजविण्याचे काम भर पावसात सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, पावसाळ्यात डांबर आणि खडीचे मिश्रण कसे टिकणार? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत.
दोडामार्ग-तिलारी-वीजघर या ३० किलोमीटर अंतराच्या रस्त्यातील १७ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण मंजूर होते; मात्र ठेकेदाराच्या वेळकाढू धोरणामुळे तिलारी ते मुळस खरारी दरम्यानचे डांबरीकरण रखडले. ते व्हावे, यासाठी प्रवीण गवस व अन्य ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. त्यानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाऐवजी खड्डे भरण्याचे काम सुरू झाले. गेले काही दिवस खड्डे भरण्याचे काम सुरू असले, तरी संबंधित ठेकेदार भरपावसात खड्डे भरण्याचे काम करत आहे. तालुक्यात आज दुपारपासून पाऊस पडतो आहे. साधारणपणे डांबरीकरणाची कामे १५ मे नंतर बंद केली जातात. डांबराला पाण्याचा स्पर्श झाला, की ते खडी आणि डांबर मिक्स होत नाही. त्यामुळे खडी विलग होऊन केलेले काम टिकत नाही. असे असले तरी भरपावसातच ठेकेदार उन्हाळी डांबर वापरून खड्डे भरण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे सार्वजानिक बांधकाम विभागही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पावसाळ्यात केलेली ती मलमपट्टी भविष्यात टिकणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, सरगवे पुनर्वसन वसाहतीतही (झरे २) तसाच प्रकार सुरू आहे. वसाहतीतील रस्त्यावर सिलकोट टाकण्याचे काम सुरू आहे. प्रथम डांबर, नंतर त्यावर पावडर मारून रोडरोलर फिरविला जात आहे; पण ते कामही पावसातच सुरू असल्याने त्याच्या टिकाऊपणाबद्दल शंका व्यक्त होत आहेत.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59726 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top