संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat19p28.jpg
22978
ःदापोली ः माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर कर्मचाऱ्यांचा गौरव करताना.
---------------
कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा गौरव
दाभोळ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ५० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून विद्यापीठामध्ये प्रकाशात न येता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कोकण कृषी विद्यापीठामधील अनेक कर्मचारी प्रत्येक कामात पडद्याआड राहून चांगले काम करतात; मात्र त्यांचे कधी कौतुक होत नाही, त्यांच्या पाठीवर कधी शाबासकीची थाप पडत नाही, त्यामुळे विद्यापीठाच्या ५० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून त्यांच्या कामाचे कौतुक करावे, अशी संकल्पना कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी मांडली व त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. त्यामध्ये डॉ. राजेश ठोकळ, डॉ. प्रवीण झगडे, डॉ. हेमंत पवार, उदय चव्हाण, नरेंद्र नाईक, रमेश मनसुटे, ज्ञानेश्वर सावंत, प्रवीण जाधव, अपर्णा तलाठी, दिलीप करमरकर, संतोष बुरटे, हर्षदा आंगणे, जगदीश भुवड, दीपक साबळे, कॅरासीन मेंडीस, सुधीर तुरे, अनंत जाधव, सदानंद मालुसरे यांचा समावेश आहे. शिपाई, वाहनचालक, कृषी सहाय्यक, प्रशासकीय कर्मचारी, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक या श्रेणीतील हे कर्मचारी आहेत. या सर्वांचा भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे फलोत्पादन विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग कुलगुरू डॉ. संजय सावंत, माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर यांच्या हस्ते गौरव केला.
----------
- rat19p37.jpg
22996
ः दापोली ः डॉ. उदयकुमार पेठे यांना (कै.) मुकुंद गणेश दांडेकर पुरस्काराने सन्मानित करताना डॉ. ए. के. सिंग.
---------------
पेठे, शिंदे, घवाळे यांचा गौरव
दाभोळ ः कृषी संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे कार्यरत असलेल्या संशोधकांना (कै.) मुकुंद गणेश दांडेकर पुरस्काराने गौरवण्यात येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी हा पुरस्कार देऊन संशोधकांना गौरविण्यात आले. २०२० साठी डॉ. उदयकुमार पेठे (कृषी महाविद्यालय, दापोली) व २०२१ -२२ साठी डॉ. वैभव शिंदे व डॉ. सुनील घवाळे (नारळ संशोधन केंद्र, भाट्ये) यांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे फलोत्पादन विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून या संशोधकांचा गौरव करण्यात आला. या वेळी कुलगुरू डॉ. संजय सावंत, माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शिक्षणसंचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, कुलसचिव डॉ. भरत साळवी उपस्थित होते.
---------------