
रत्नागिरी- हातिस येथे नारळ बागायतदारांचा मेळावा
हातिसला सोमवारी नारळ बागायतदारांचा मेळावा
रत्नागिरी ः भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि तालुक्यातील हातिस येथे कल्पवृक्ष लागवडीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २२ मे रोजी हातिस येथे नारळ बागायतदारांचा मेळावा आयोजित केला आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पीर बाबरशेख मंदिर परिसरात मेळावा होईल. हातिस ग्रामविकास मंडळ (हातिस व मुंबई), नारळ विकास मंडळाचे ठाणे केंद्र, दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि भारत अॅग्रो सर्व्हिसेस (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्यासह माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर आदी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात सकाळी ९ वा. नारळापासून खाद्यपदार्थ स्पर्धा, सकाळी १० वा. प्रदर्शनाचे उद्घाटन, तज्ञांचे मार्गदर्शन, सकाळी ११ वा. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण, विशेष सत्कार, दशक्रोशीतील सरपंचांना नारळ रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. मेळाव्यानिमित्त नारळ झाडावर चढणे व झाप विणण्याची स्पर्धा २१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59738 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..