खेड ः उधळेनजीक कारला अपघात, पाचजण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः उधळेनजीक कारला अपघात, पाचजण जखमी
खेड ः उधळेनजीक कारला अपघात, पाचजण जखमी

खेड ः उधळेनजीक कारला अपघात, पाचजण जखमी

sakal_logo
By

-rat19p38.jpg
22997
ः खेड ः उधळेनजीक उलटलेली मोटार.
----------
उधळेत मोटार अपघातात पाच जखमी
खेड, ता. १९ ः मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील उधळे गावानजीक मोटार महामार्गलगत असणाऱ्या लोखंडी संरक्षक कठड्याला ठोकरून झालेल्या भीषण अपघातात पाचजण झाले. हा अपघात गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. मोटारीतील सर्व प्रवासी कल्याणहून रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर येथे जात होते. सर्व जखमींवर खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा चोवबे (रा. कल्याण) हे गुरुवारी मोटारीने (एमएच-०५-इएल-८९८२) कल्याण ते राजापूर असे जात होते. पहाटे ६.३० वा. उधळे गावाजवळ त्यांना झोप अनावर झाली. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून महामार्गाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या लोखंडी संरक्षण कठड्यावर जाऊन मोटार आदळली. या अपघातात चालक कृष्णा चोवबे यांच्यासह एकाच कुटुंबातील रूपेश संदीप पांचाळ (वय २६), वनिता संदीप पांचाळ (१४), सिद्दिकी रूपेश पांचाळ (२२), यश योगेश पांचाळ (१९, सर्व रा. कल्याण) हे जखमी झाले. सर्व जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.