शेतातील माती तत्काळ हटवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतातील माती तत्काळ हटवा
शेतातील माती तत्काळ हटवा

शेतातील माती तत्काळ हटवा

sakal_logo
By

swt1928.jpg
23034
पाडलोसः शेतात असलेले मातीचे ढिगारे दाखविताना महेश कुबल. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर )

शेतातील माती तत्काळ हटवा
महेश कुबलः पाडलोसमध्ये काम रोखण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ः बांदा - शिरोडा मार्गावरील पाडलोस - केणीवाडा येथे पाईपलाईन खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरू असून, खोदाई केलेल्या मातीचे ढिगारे शेतात डोंगराप्रमाणे उभे आहेत. पावसाळ्यात ही सर्व माती शेतात जाऊन नुकसानीची भीती आहे. जादा यंत्राच्या साहाय्याने तत्काळ ही माती व शेतातील झाडे हटवावीत; अन्यथा काम रोखणार असल्याचा इशारा, शेतकरी तथा पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी शेतकऱ्यांच्यावतीने प्रशासनास दिला आहे.
पाईपलाईन खोदाई करताना यंत्राच्या साहाय्याने अनेक झाडे काढून शेतात फेकून दिली. शेतकरी आनंद कुबल यांच्या शेताजवळून जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोरे पुलाच्या तोंडावर भलेमोठे झाड फेकले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून संपूर्ण रस्ता खचण्याची तसेच भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर बस थांब्याजवळ केवळ मातीच्या साहाय्याने बुजविण्यात आलेल्या चरात पशुपालक विश्वनाथ नाईक यांची म्हैस रुतली होती. सुदैवाने म्हशीला कोणतीही इजा झाली नाही. सद्यस्थितीत अशी अवस्था, तर पावसाळ्यात जनावरांचे काय होणार, याचा विचार संबंधित अधिकाऱ्यांनी करावा, असेही श्री. कुबल म्हणाले.
ठेकेदाराला वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेती वाचविण्यासाठी आम्हाला काम रोखावे लागणार. तत्पूर्वी संबंधित कंपनीच्या ठेकेदारांनी जादा यंत्राचा वापर करून तत्काळ शेतातील मातीचे ढिगारे व झाडे हटवावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59753 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top