रत्नागिरी-पुरस्कारप्राप्त नऊ शेतकऱ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पुरस्कारप्राप्त नऊ शेतकऱ्यांचा गौरव
रत्नागिरी-पुरस्कारप्राप्त नऊ शेतकऱ्यांचा गौरव

रत्नागिरी-पुरस्कारप्राप्त नऊ शेतकऱ्यांचा गौरव

sakal_logo
By

- rat19p34.JPG-
22986
रत्नागिरी ः पुरस्कारप्राप्त शेतकरी शेखर विचार यांचा सन्मान करताना खासदार विनायक राऊत. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रोहन बने, राजू महाडिक आदी.
----------------
रत्न कृषी महोत्सवात पुरस्कारप्राप्त
नऊ शेतकऱ्यांचा गौरव

रत्नागिरी, ता. १९ ः शहरातील प्रमोद महाजन क्रीडांगणावर सुरू असलेल्या रत्न कृषी महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शनात राज्य, जिल्हास्तरावर पुरस्कार विजेत्या शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे, रोहन बने, राजू महाडिक आदी उपस्थित होते. कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी हरिश्चंद्र शिगवण (कुंभवे, ता. दापोली), मिलिंद वैद्य (रीळ, ता. रत्नागिरी), शेखर विचारे (वरवेली, ता. गुहागर) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खरीप हंगाम भातपिक स्पर्धा २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील उच्च उत्पादन घेणारे शेतकरी शांताराम खापरे (शेडवई ता. मंडणगड), विलास किंजळे (वाटद, ता. रत्नागिरी), वसंत घरवे (निगडे, ता. दापोली), आत्माराम गोनबरे (भगवतीनगर, ता. रत्नागिरी), चंद्रकांत जान्स्कर (कोतापूर, ता. राजापूर), सूर्यकांत दाभिळकर (चिंचाळी, ता. दापोली) यांचाही या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रत्नकृषी महोत्सवात शनिवारी (ता. २१) सकाळी ११ ते १२.३० वा. या वेळेत कृषी पणन मंडळाकरिता संधी या विषयावर सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी शेतकऱ्‍यांना माहिती देणार आहेत. त्यानंतर ३ ते ५ वा. या वेळेत मत्सप्रक्रिया व मत्स्यवर्धन याबाबत मत्स्य महाविद्यालयातर्फे माहिती देण्यात येणार आहे. सायं. ७ ते १० या वेळेत महाराष्ट्र व कोकणातील लोककला याबाबत सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. रविवारी (ता. २२) मे रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत जिल्हा संसाधन व्यक्ती शेखर विचारे आणि अग्रणी बँक व्यवस्थापक एन. डी. पाटील हे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59757 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top