केसरकरांनी रस्त्यांची कामे रखडवली - संजू परब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकरांनी रस्त्यांची कामे रखडवली - संजू परब
केसरकरांनी रस्त्यांची कामे रखडवली - संजू परब

केसरकरांनी रस्त्यांची कामे रखडवली - संजू परब

sakal_logo
By

swt1930.jpg
23046
सावंतवाडी : येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष संजू परब. सोबत शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

केसरकरांनी रस्त्यांची कामे रखडवली
संजू परब ः कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः पावसाळा तोंडावर आला तरी केवळ उद्घाटन करायला मिळावे, यासाठी आमदार दिपक केसरकर शहरातील चार रस्त्याची कामे रोखून ठेवून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजु परब यांनी येथे केला.
आमचा विकास कामांना विरोध नाही; मात्र बबन साळगावकर यांनी सात वर्षात केसरकरांना पालिकेची पायरी का चढायला दिली नाही ते आत्ता कळून चुकले, असा टोलाही श्री. परब यांनी लगावला. श्री. परब यांनी आज याठिकाणी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत यावेळी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, दिपाली भालेकर, नासीर शेख, उत्कर्षा सासोलकर, बंटी पुरोहित, अजय सावंत, दिलीप भालेकर, बंटी जामदार आदी उपस्थित होते.
श्री. परब म्हणाले, ‘‘सावंतवाडी शहरात चार रस्त्याच्या कामांना नगरोत्थानमधून मंजूर मिळाली आहे. यासाठी आवश्यक सोपस्कार आम्ही भाजपाच्या माध्यमातून केले होते. हा निधी पालिकेच्या हक्काचा निधी असतो. त्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत; मात्र आमदार केसरकर निमंत्रण पत्रिका प्रसिध्द करत आपल्या विशेष प्रयत्नातून ही कामे मंजुर झाल्याचे सांगत त्या कामाच्या भुमीपुजनाचा घाट घातला आहे. आमचा विकास कामांना विरोध नाही. केसरकरांनी त्या कामाचे जरुर भुमीपूजन करावे; मात्र निमंत्रण पत्रिकेवर किमान त्या भागातील माजी नगरसेविकांचे तरी नाव घातले पाहिजे होते. तसे न करता प्रशासक, मुख्याधिकारी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी असे म्हणणे चुकीचे आहे. मुळात पावसाळा तोंडावर आला असताना ही कामे वेळेत होणे गरजेचे होते; मात्र प्रशासनाचे लक्ष वेधून सुरु केलेले काम सुद्धा आमदार केसरकरांनी संबधित ठेकेदाराला बंद करायला भाग पाडले. केवळ भूमीपूजन करुन त्या कामाचे क्रेडिट घेण्याचा त्यांचा प्रयत्न असून उद्या पाऊस पडून ते काम दर्जाहीन झाले तरी त्यांना चालेल. केसरकरांचा हा मनमानी कारभार आम्ही खपवून घेणार नाही. केसरकर यांच्या अशाच मनमानी कारभाराला कंटाळून बबन साळगावकर यांनी आपल्या सात वर्षाच्या कार्यकाळात त्यांना पालिकेची पायरीही चढायला दिली नाही, ते आत्ता कळायला लागले आहे.’’

चौकट
मुख्याधिकाऱ्यांवरही टिका
श्री. परब म्हणाले, ‘‘आज मुख्याधिकारी केसरकरांचे शाखा प्रमुखासारखे काम करत आहेत. मुळात पालिकेचे पैसे वाचविले असे सांगून ते चिवार टेकडी येथील ज्या पालिकेच्या मालकीच्या इमारतीत राहतात तेथे लाईट गेल्यावर उपाय म्हणून जनरेटर खरेदी कसा काय करतात? दुसरीकडे पालिकेत कामे घेऊन जाणाऱ्या माजी नगरसेविकांना बारिक सारीक कामे मला सांगू नका असा बजेजावही ते करतात. याचा अर्थ काय? आज पालिकेच्या बाथरुममध्ये टाकायला फिनेल नाही, विचारले तर उत्तर काय तर पालिकेजवळ पैसे नाही.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59767 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top