रत्नागिरी ः पानवल धरणासाठी हवेत 10 कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः पानवल धरणासाठी हवेत 10 कोटी
रत्नागिरी ः पानवल धरणासाठी हवेत 10 कोटी

रत्नागिरी ः पानवल धरणासाठी हवेत 10 कोटी

sakal_logo
By

पानवल धरणासाठी हवेत दहा कोटी

‘मेरी’ संस्था करणार सर्वेक्षण; मजबुतीकरण आवश्यक

रत्नागिरी, ता. १९ ः रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. या ठिकाणी काँक्रिटची भिंत उभारावी की अन्य प्रकारची, याबाबत नाशिकच्या मेरी या संस्थेकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठ्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रत्नागिरी शहराला प्रामुख्याने शीळ, पानवल व नाचणे या तीन धरणांतून पाणीपुरवठा होतो. यापैकी पानवल धरणातील पाणीसाठा दरवर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस संपुष्टात येतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा येते. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त येते.
पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची मोठी कसरत करावी लागते. १९६५ मध्ये रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पानवल धरणाची बांधणी करण्यात आली. धरणाच्या दुरुस्तीसाठी डागडुजीसाठी २०१६ मध्ये प्रशासन स्तरावर ९ कोटींच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. नवीन धरण बांधायचे झाल्यास सुमारे ६ वर्षे तरी लागणार आहेत. धरणाच्या दुरुस्तीसाठी या धरणाच्या मजबुतीकरण व दुरुस्तीसाठी आता सुमारे १० कोटींची आवश्यकता लागणार आहे.

----
चौकट

‘शीळ’च्या दुरुस्तीसाठी हवेत १२ कोटी
शीळ धरणाच्या सांडव्यालगत असलेल्या दरडीच्या भागात गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यामुळे सांडवा सुरक्षित राहावा, यासाठी भूस्खलनाच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव १२ कोटी २४ लाखांचा असून, त्याला मंजुरी मिळणे बाकी आहे.