
तळाशील येथे बंधारा कामास सुरुवात
swt1931.jpg
23061
तळाशीलः येथील बंधाऱ्याच्या कामाचा प्रारंभ आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
तळाशील येथे बंधारा
कामास सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १९ः तळाशील बंधाऱ्याचे काम मार्गी लावले जाईल, असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार हा शब्द पाळत आज या बंधाऱ्याच्या कामाचा प्रारंभ श्री. नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
तळाशील ग्रामस्थांनी बंधाऱ्यासाठी १५ ऑगस्टला उपोषण छेडले होते. उपोषणस्थळी ग्रामस्थांना आमदार नाईक यांनी बंधाऱ्याचे काम लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले होते. त्यानुसार तळाशील गावासाठी आमदार नाईक यांनी मंजूर करून घेतलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला आज सायंकाळी सुरुवात करण्यात आली. बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात झाल्याने आमदार नाईक यांनी तळाशील ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे.
यावेळी बबन शिंदे, तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर, तोंडवळी सरपंच आबा कांदळकर, जयहरी कोचरेकर, संजय केळूसकर, विवेक रेवंडकर, नंदकिशोर कोचरेकर, विजय रेवंडकर, संजय जुवाटकर, भाऊ चोडणेकर, ताता टिकम, प्रकाश बापर्डेकर, महेश मालंडकर, चरण रेवंडकर, पतन अभियंता चंद्रकांत आयरेकर, सहाय्यक पतन अभियंता पी. बी. पवार, कनिष्ठ अभियंता समाधान जाधव आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59794 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..