गोवा बनावटीच्या दारूचे हजार बॉक्स जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thousands of Goa made liquor seized
दारूचे हजार बॉक्स जप्त

गोवा बनावटीच्या दारूचे हजार बॉक्स जप्त

खेड - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील स्पेशल पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर मोठी कारवाई करीत गोवा बनावटीच्या दारूचे हजार बॉक्स जप्त केले. ही कारवाई लवेल (ता. खेड) येथे करण्यात आली. यात सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोव्यातून गोवा बनावटीच्या दारूने भरलेला ट्रक मुंबईकडे जायला निघाला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या खास पथकाने महामार्गावर पाळत ठेवून लवेल येथे हा ट्रक ताब्यात घेतला. दारूने भरलेला हा ट्रक सध्या उत्पादन शुल्क विभागाच्या खेड कार्यालयाच्या ताब्यात असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गोव्यात तयार होणारी दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वितरित केली जाते. खरे तर गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उत्पादन शुल्क विभागासह पोलिसही पाळत ठेवून असतात. मात्र, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पोलिसांच्या डोळ्यांत धूळ झोकून दारूची वाहतूक करणारे दारू माफिया गोवा बनावटीच्या दारूचा व्यवसाय करीत असतात.
या कारवाईसाठी खास पथकाची स्थापना करून मुंबई-गोवा महामार्गावर गस्त सुरू केली होती. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी लवेल येथे गस्त घालत असताना त्यांना गोव्याकडून मुंबईकडे जाणारा तो ट्रक आढळून आला.

अधिकाऱ्यांनी तो ट्रक थांबवून तपासणी केली असता, ट्रकच्या मागील भागात सुमारे एक हजार बॉक्स आढळून आले. अधिकाऱ्यांनी चालकाला याबाबत विचारणा केली असता, तो उत्तरे देऊ शकला नाही. अधिकाऱ्यांनी तो ट्रक दारूच्या बॉक्ससह ताब्यात घेऊन खेड येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणला. सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी चालकाची कसून तपासणी करीत असून, दारू माफियांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59837 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RatnagiriGoacrimeliquor
go to top