टुडे पान एक-सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील बाजूपट्टी चिखलामुळे धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक-सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील
बाजूपट्टी चिखलामुळे धोकादायक
टुडे पान एक-सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील बाजूपट्टी चिखलामुळे धोकादायक

टुडे पान एक-सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील बाजूपट्टी चिखलामुळे धोकादायक

sakal_logo
By

23161
माजगाव : येथे रस्त्याच्या बाजूपट्टीवर टाकलेल्या मातीमुळे निर्माण झालेली दलदल.


सावंतवाडी-शिरोडा मार्गाच्या
बाजूपट्टीवर चिखलच चिखल

पावसाचा परिणाम; अपघातांची भीती

सावंतवाडी, ता. २० ः तालुक्यात आज कोसळलेल्या तुरळक पावसामुळे सावंतवाडी-शिरोडा या महामार्गावरील माजगाव येथे टाकण्यात आलेल्या साईटपट्टीवरील मातीमुळे दलदल निर्माण झाली आहे. याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपुर्वी शिरोडा-सावंतवाडी या रस्त्याच्या नव्या डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर संबधित ठेकेदाराकडून बाजूपट्टीवर माती घातली होती. ही माती चिऱ्याची दगडयुक्त माती नसल्याने काल (ता.१९) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे माजगाव येथे टाकलेल्या मातीमुळे रस्त्याच्या दोन्ही कडेला मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण झाली आहे. ही माती वाहनाच्या टायरबरोबर रस्त्यावर येत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने पावसाच्या तोंडावर हे काम केल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवस सुशेगात असलेल्या बांधकाम विभागाच्या बेफिकीरीमुळे याठिकाणी अपघात झाल्यास त्याला बांधकाम अधिकारी जबाबदार राहणार असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांनी बोलून दाखविली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59918 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top