
कणकवली :न्यायालयीन कोठडी
बिबट्याच्या कातडी प्रकरणी
संशयितांना न्यायालयीन कोठडी
कणकवली, ता.२० ः बिबट्याचे कातडे विक्री करण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक गुन्हा अन्वेशन पथखाने छापा टाकून केलेल्या कारवाईत आतापर्यंत एकूण ६ संशयितांना अटक करण्यात आली आहे. संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
सुभाष विलास तावडे (वय २९, रा. ओझरम, ता.कणकवली), प्रकाश अण्णा देवळेकर (वय ४३, रा.म्हाळुंगे, ता.देवगड), संजय पुंडलिक घाडीगांवकर (वय ५४, रा.म्हाळुंगे, ता.देवगड), वामन शिवाजी देवळेकर (वय ४३), जयसिंग पांडुरंग नवले (वय ४६), राकेश पांडुरंग नवले (वय ३६, सर्व रा.म्हाळुंगे, देवळेकरवाडी, ता.देवगड), अशी संशयितांची नावे आहेत. १४ मे रोजी ही कारवाई झाली होती. या प्रकरणी बिबट्याचे कातडे, १७ नखे, दात, खडकाळ भागात टाकलेली हाडे, लोखंडी भाला, तारेची फासकी, कोयता, कटर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बिबट्याचा फासकीत अडकून मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यातील सहा संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले होते. पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस नाईक पांडुरंग पांढरे, कॉन्स्टेबल चंद्रकांत झोरे आदी पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60030 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..