
आरवली ः कडवई-चिखली रस्त्याची दुरुस्ती 23 मे पासून
-rat20p16.jpg
23170
ः देवरूख ः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (देवरूख) सहाय्यक कार्यकारी अभियंता पूजा इंगवले या आंदोलनकर्त्यांना रस्ता दुरुस्ती कामाचे पत्र देताना.
-----------------
रिक्षा मालक-चालकांचे आंदोलन स्थगित
कडवई-चिखली रस्त्याची दुरुस्ती २३ मे पासून; लेखी आश्वासन
आरवली, ता. २० ः संगमेश्वर तालुक्यातील कडवई-चिखली रस्त्याच्या दुरुस्ती कामाची सुरवात २३ मे पासून करत असल्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (देवरूख) सहाय्यक कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यामुळे रिक्षामालक-चालक संघटना कडवई-तुरळ-चिखली यांच्यावतीने सुरू असलेले आंदोलन स्थगित करत असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष संदीप चिले यांनी जाहीर केले.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रिक्षा संघटनेच्यावतीने गेली दोन वर्षे पाठपुरावा केला जात होता; मात्र बांधकाम विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते. अखेर रिक्षा संघटनेच्यावतीने ९ मे रोजीच्या पत्रांतून १९ मे रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र १९ मे पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने अखेर रिक्षा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
१९ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून रिक्षा संघटनेचे सर्व सदस्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरूख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले. संध्याकाळी साडेसहा वाजता देवरूख पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता पूजा इंगवले या आंदोलनस्थळी उपस्थित झाल्या. या वेळी आंदोलनावर ठाम असणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या रेट्यामुळे २३ मे पासून कडवई-चिखली रस्त्याच्या दुरुस्ती कामास सुरवात करत असल्याचे त्यांनी पत्र देण्यात आले. मात्र, 23 मे ला काम सुरू न झाल्यास बांधकाम विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला तसेच हे काम बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली व्हावे, असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनाला मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, युयुत्सु आर्ते यांनी उपस्थित राहून सक्रिय पाठिंबा दिला.
---------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60032 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..