
राजापूर ः ओणी गणातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत
ओणी गणातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत
राजापूर, ता. २० ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीचे ढोल वाजत असताना तालुक्यातील ओणी पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी पंचायत समिती सदस्य प्रतीक मटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या साऱ्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधत सेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला.
ओणी येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यामध्ये या सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी स्वागत केले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य मटकर यांनी राष्ट्रवादीचे विभागाध्यक्ष दयानंद चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक उपाध्यक्ष मनिष लिंगायत, बूथ कमिटी अध्यक्ष जितेंद्र वेताळे, ओणी विभागाचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष समीर तुळसणकर, सचिन टाकळे या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काल ता. १९ रोजी ओणी येथे झालेल्या मेळाव्यामध्ये मटकर यांच्या नेतृत्वाखाली खरवते, वडवली, कोंडीवळे, वडदहसळ आदी गावांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी सेना प्रवेश केला.
...
चौकट
उपविभागप्रमुखपदी चौगुले
ओणी विभागामध्ये राष्ट्रवादी रुजवण्यासह वाढवण्यामध्ये योगदान देणारे दयानंद चौगुले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताच त्यांची शिवसेनेच्या ओणी पंचायत समिती गणाच्या उपविभागप्रमुखपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीची शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी या मेळाव्यामध्ये घोषणा केली.
------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60033 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..