संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

कुणबी सेवाच्या वसतिगृहात प्रवेश सुरू
दाभोळ ः दापोली येथील कुणबी सेवासंघाच्या मुलांसाठी नवभारत छात्रालय आणि मुलींसाठी सामंत गुरुजी कन्या छात्रालयात प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. नवभारत छात्रालयाची प्रवेशक्षमता १०० इतकी आहे. सामंत गुरुजी कन्या छात्रालय या विद्यार्थिनी वसतिगृहाची प्रवेशक्षमता ५० इतकी आहे. या दोन्ही छात्रालयात सर्व जाती-धर्मातील, विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. या विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे माहितीपत्रक तसेच छात्रालयात प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक पात्रता आणि प्रवेश अर्ज भरताना घ्यावयाची काळजी व सोबत जोडावयाची प्रमाणपत्रे याबाबतचे माहितीपत्रक संस्थेमध्ये उपलब्ध आहे. प्रवेशअर्ज संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. प्रवेशअर्ज आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संस्थेच्या कार्यालयात ३० मे पर्यंत स्वीकारले जातील. आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
--------------
हर्णै-गिम्हवणे डांबरीकरणाला सुरवात
दाभोळ ः हर्णै ते गिम्हवणे श्रीराम मंदिर रस्ता डांबरीकरणाचे उदघाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते झाले. गिम्हवणे-दुबळेवाडी श्रीराम मंदिराकडे जाण्यासाठी हर्णै मार्ग ते श्रीराम मंदिर रस्ता डांबरीकरणाचे काम आमदार कदम यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले. उदघाटनाला सरपंच साक्षी गिम्हवणेकर, माजी सरपंच सुवर्णा खळे, श्रीराम मंडळाचे अध्यक्ष दीपक दुबळे, उपाध्यक्ष सनी दुबळे, दुबळेवाडी प्रगती महिलामंडळ अध्यक्षा मानसी दुबळे आदी उपस्थित होते.
-------
-rat20p22.jpg
23180
ः राजापूर ः ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पांडुरंग उपळकर यांचा सत्कार करताना खासदार विनायक राऊत.
-----------
पांडुरंग उपळकर यांची निवड
राजापूर ः जिल्ह्यामध्ये शिवसेना रुजवण्यासह संघटनात्मक बांधणी करत अधिक वृद्धिंगत करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर यांची सेनेच्या रत्नागिरी जिल्हा (दक्षिण विभाग)च्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख विश्‍वनाथ लाड, रामचंद्र सरवणकर, वसंत जड्यार, शरद लिंगायत, उमेश पराडकर, प्रतीक मटकर, विनोद शिंदे, दयानंद चौगुले, अभय चव्हाण आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60062 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top