रत्नागिरी ः रुग्णवाहिकांनी 17 हजार 416 जखमींना जीवनदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रुग्णवाहिकांनी 17 हजार 416 जखमींना जीवनदान
रत्नागिरी ः रुग्णवाहिकांनी 17 हजार 416 जखमींना जीवनदान

रत्नागिरी ः रुग्णवाहिकांनी 17 हजार 416 जखमींना जीवनदान

sakal_logo
By

- rat20p26.jpg-
L23262
रत्नागिरी ः जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका.
--------------
रुग्णवाहिकांमुळे १७, ४१६ जखमींना जीवदान

जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान; सहा महामार्गांवर २७ रुग्णवाहिका
रत्नागिरी, ता. २१ ः श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकांमधून गेल्या १२ वर्षांत १७ हजार ४१६ जणांना जीवनदान दिले आहे. अपघात झाल्यानंतर जखमींना संस्थानच्या रुग्णवाहिकेतून योग्य वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली. विविध राष्ट्रीय महामार्गावर नेमलेल्या २७ रुग्णवाहिकांनी ८ हजार ६४२ अपघातस्थळांवर मोफत सेवा देत आहे.
संस्थानच्या सामाजिक उपक्रमांपैकी मोफत रुग्णवाहिका सेवा हा महत्वपूर्ण उपक्रम आहे. सध्या मुंबई- गोवा, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-सोलापूर-हैदराबाद, मुंबई-आग्रा- पुणे-बंगलोर, रत्नागिरी-नागपूर अशा सहा महामार्गावर महाराष्ट्राच्या हद्दीत वेगवेगळ्या गावी संस्थानच्या रुग्णवाहिका कार्यरत आहेत. अपघात झाल्यानंतर त्यातील जखमींकडे कोणीही पाहत नाही. त्यातील काहींना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागतात. यावरून स्वामीजींना रुग्णवाहिका सेवेची कल्पना सुचली होती. या योजनेची सुरवात २५ जुलै २०१० रोजी गुरुपौर्णिमेच्या दिनी झाली. त्यामुळे या रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी जीवनवाहिन्या बनलेल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट, संगमेश्वर, हातखंबा, राजापूर येथे रुग्णवाहिका आहेत. त्यामार्फत १ हजार ७७० अपघातस्थळी जाऊन ४ हजार २५० जखमींना रुग्णालयात पोहोचवले. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर नाणीज, बांबवडे, सांगोला, मंगळवेढा अशा चार ठिकांणी रुग्णवाहिका आहेत. आतापर्यंत ७४ अपघातस्थळी जाऊन १४८ जखमींना सेवा दिली. पोलिसांनाही ही सेवा उपयोगी पडत आहे. रात्री, अपरात्री कोणत्याहीवेळी रुग्णवाहिका अपघातस्थळी धावत असते. अनेकदा रुग्णवाहिकांचे चालकही बचावकार्यात पोलिस अथवा स्थानिकांच्या मदतीला धावून जातात.
..
ग्राफ करावा
..
एक नजर..
अपघातस्थळः १ हजार ७७०
जखमींना रुग्णालयात पोचवलेः ४ हजार २५०
..
अपघातस्थळः ७४
जखमींना दिली सेवाः १४८

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60065 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..