चिपळूण-चिपळूण बसस्थानकासमोरील तुंबलेले गटाराची सफाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-चिपळूण बसस्थानकासमोरील तुंबलेले गटाराची सफाई
चिपळूण-चिपळूण बसस्थानकासमोरील तुंबलेले गटाराची सफाई

चिपळूण-चिपळूण बसस्थानकासमोरील तुंबलेले गटाराची सफाई

sakal_logo
By

-ratchl205.jpg
23310
- चिपळूण ः मध्यवर्ती बसस्थानकासमोरील गटारासाठी खोदाई करून ते असे मोकळे करण्यात आले आहे.
-----------
चिपळूण बसस्थानकासमोरील
तुंबलेल्या गटाराची सफाई

चिपळूण, ता. २० ः येथील पालिका प्रशासनाने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील तुंबलेल्या गटाराची अखेर दखल घेतली आहे. या परिसरातील सर्व हातगाड्या व टपऱ्या हटवून तेथे गटरासाठी खोदाई करून ते मोकळे करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांना होणारा डासांचा व दुर्गंधीचा त्रास कमी होणार आहे.
चिपळूण आगारासमोर मुख्य रस्त्याच्या पलिकडे असणारे हे गटार काही ठिकाणी मातीने बुजले होते. त्यातच नवीन पार्किंग क्षेत्रासाठी पालिका प्रशासनाने नदीतील गाळ या परिसरात टाकल्याने सांडपाणी वाहून जाणारा मार्गच बंद झाला होता. त्यामुळे हे गटार तुंबले होते. या तुंबलेल्या गटारात प्लास्टिक बॉटल्स व कचरा मोठ्या प्रमाणावर साचला होता. डासांचे प्रमाण वाढले होते. याबरोबरच दुर्गंधीमुळे तेथील व्यावसायिक, नागरिक आणि प्रवासीही हैराण झाले होते. पावसाळा जवळ आला तरी या गटारांची स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाने लक्ष न दिल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. अखेर त्याची दखल घेऊन पालिकेने जेसीबीच्या साहाय्याने तेथील गटारासाठी खोदाई केली. हे गटार भोगाळे येथील नाल्यात सोडण्यात आले आहे. या कामात कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी या परिसरात असणाऱ्या सर्व हातगाड्या, टपऱ्या हटवण्यात आल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60100 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top