दोन मोटारींमध्ये झरेबांबरमध्ये अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन मोटारींमध्ये झरेबांबरमध्ये अपघात
दोन मोटारींमध्ये झरेबांबरमध्ये अपघात

दोन मोटारींमध्ये झरेबांबरमध्ये अपघात

sakal_logo
By

23351
झरेबांबर : विमानतळ येथील अपघातग्रस्त मोटारी.

झरेबांबरला दोन मोटारींमध्ये धडक

रस्त्यावरील खडीमुळे घटना; दोन महिलांसह एक जखमी, दोन मुले बचावली

सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. २० : दोडामार्ग-तिलारी मार्गावर झरेबांबर विमानतळ येथे रस्त्यात पडलेल्या खडीमुळे दोन मोटारींची समोरासमोर धडक झाली. त्यात दोन महिला आणि एक पुरुष जखमी झाले. त्यात एका गर्भवतीचा समावेश आहे. सुदैवाने त्यांच्या सोबत असणारी दोन छोटी मुले अपघातातून बचावली.
जखमींवर दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. खडी वाहून नेणारा संबंधित वाहनचालक आणि सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे तो अपघात झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही मोटारींमधील पुढच्या भागातील एअर बॅग उघडल्याने मोठा अपघात टळला. अपघातात दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले. हिरेमठ यांच्या मोटारीतून (जीए ०४ ई ५४३६) सरोजा हिरेमठ, अमर कोळेकर, आरती कोळेकर, तेजश्री नाईक, दोन लहान मुले दोडामार्गकडे जात होती. मदन नाईक मोटार चालवत होते. गर्भवतीला तपासणीसाठी दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात नेले जात होते. तर संतोष नाईक मोटारीने (जीए ०७ एल २३८९) गोव्याकडून वायंगणतडकडे जात होते. झरेबांबर विमानतळ येथे उतार आणि वळण असलेल्या ठिकाणी बऱ्याच अंतरापर्यंत अर्धा इंची काळया खडीचा थर पसरला होता. त्याठिकाणी दोन्ही मोटारी आल्या असता समोरासमोर अपघात झाला. बाजूलाच राहणाऱ्या आरोग्यसेविका संजीवनी गवस आणि त्यांचे पती संदेश सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. १०८ रूग्णवाहिकेशी संपर्क साधला; पण ती यायला उशीर लागणार असल्याने श्री. सावंत यांनी खासगी मोटारीतून जखमींना तत्काळ दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात नेले. दरम्यान, एकटेच प्रवास करणारे संतोष नाईक यांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने बाळा नाईक व अन्य नातेवाईकांनी त्यांना दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात नेले. रस्त्यात पडलेल्या खडीबद्दल बांधकामच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारीच (ता.१९) कळविले होते; पण त्यांनी ती खडी दूर करण्याबाबत तत्परता दाखवली नाही. त्यामुळे रात्री दोन तर सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. त्यात दुचाकीस्वार जखमी झाले. बांधकाम कार्यालयाला भेट दिली असता कार्यालयांत शिपाई वगळता कुणीही नसल्याचे दिसून आले.
-----------
युवकांकडून रस्त्याची साफसफाई
रस्त्यात पडलेल्या खडीमुळे आणखी अपघात होऊ नयेत म्हणून तत्काळ समीर रेडकर, दीपक पावसकर, ऋषिकेश सोलापूरकर, शुभम मणेरीकर, विठ्ठल बोंद्रे, रामू शिंदे, साहिल शिंदे यांच्यासह अनेकांनी रस्त्यातील खडी बाजूला करून रस्त्याची साफसफाई केली.
---------
पोलिस उशिरा पोचले
भररस्त्यात दोन्ही गाड्या एकमेकाला धडकल्याने अपघातानंतर वाहतूक एका मार्गाने सुरू होती. अपघाताची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली ; पण पोलिस खूपच उशिरा पोचले. त्यांचा लँडलाईन फोनही बंद होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60155 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top