सात ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी एकही अर्ज नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सात ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी एकही अर्ज नाही
सात ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी एकही अर्ज नाही

सात ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी एकही अर्ज नाही

sakal_logo
By

सात ग्रामपंचायतींच्या रिक्त
जागांसाठी एकही अर्ज नाही

कणकवली तालुक्यातील स्थिती

कणकवली,ता. २१ ः तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या ११ रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे या सातही ग्रामपंचायत निवडणुका न झाल्याने जागा रिक्त राहणार आहेत. तालुक्यातील चिंचवली, नांदगाव, वांयगणी, नडगीवे प्रत्येकी एका जागेसाठी तर ओझरमच्या तीन, वेळणे खुर्द व नडगीवेच्या प्रत्येकी दोन अशा अकरा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही १३ ते २० मे दरम्यान होती. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी (ता.२०) शेवटचा दिवस होता; मात्र, एकाही रिक्त जागेवर अर्ज प्राप्त झाला नसल्याने निवडणूक विभागाने सांगितले. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या रिक्त जागा कायम राहणार आहेत. मुळात मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील दोन-तीन महिन्यांत होणार असल्याने या रिक्त जागांवर उमेदवारी अर्ज भरले गेले नाहीत, अशी शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60231 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..