रत्नागिरी ः कृषी संस्कृतीत अपरिहार्य बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः कृषी संस्कृतीत अपरिहार्य बदल
रत्नागिरी ः कृषी संस्कृतीत अपरिहार्य बदल

रत्नागिरी ः कृषी संस्कृतीत अपरिहार्य बदल

sakal_logo
By

(संस्कृती ..................लोगो)
rat21p7.jpg ः
23397
- अंजली बर्वे
..
इंट्रो
वर्षानुवर्षे एका पिढीकडून दुसऱ्‍या पिढीकडे अशा पारंपरिक व्यवसायाचे बाळकडू आपोआप मिळत जाते; परंतु आज शिक्षणपद्धतीने हे शिक्षण दुरापास्त झाले आहे. अनेक कलाकौशल्य असलेली कामे आधुनिक यांत्रिकीकरण आणि नोकरीप्रधान शिक्षणामुळे हस्तांतरित होत नाहीत. भारत हा शेतीप्रधान देश आहे. बहुतांश शेतकरी हे खेडोपाडी राहतात. त्यामुळे शेती आणि पूरक व्यवसाय यांना दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान आहे; परंतु येथील कृषी संस्कृतीचे परिवर्तन अनेक कारणाने होताना दिसते.
- अंजली बर्वे, चिपळूण
-------------------------------------------------
कृषी संस्कृतीत अपरिहार्य बदल

काळे ढग आकाशात विहार करू लागले आणि हवामानखात्याने पावसाच्या आगमनाचे संकेत दिले की, कोकणात आगोटपूर्व कामांना गती येते. म्हणजेच पावसाळापूर्व काम! मनाची आणि हाता-पायाची लगबग! आधी पालापाचोळा गोळा करून शेतीसाठी भाजावळ करावी की, रातांबे झोडून, फोडून कोकम वाळवावीत? ओहोळ, नाले साफसफाई करावी की लाकूडफाटा, गवतभारे आडोशाला आणावेत? घेतलेल्या पिकांचे म्हणजे कुळीथ, वाल कडवे, मूग किंवा उडीद काढून, झोडून वाळले तर पाहिजेत. वर्षातून एकदाच मिळणारे उत्पन्न म्हणजे आंबे आणि फणस! कैरीचे लोणचे, आंब्याचा आटवलेला रस, मुरंबा, तळलेले गरे आणि बाटलीबंद किंवा टिंन पॅकिंग रस, कोकम सरबत, आगळ ही कामेसुद्धा याच दिवसात करायची; पण प्रथम क्रमांक द्यायचा, तो उन्हाची गरज असणाऱ्या कामांना! फणस, आंबा साटे आणि आमसूल पावसाळा यायच्या आतच व्हायला हवीत. त्यामुळे ज्येष्ठ महिना फार धावपळीचा असतो कष्टकरी वर्गाला!
एकत्र कुटुंबपद्धतीमुळे शेती व्यवसाय सुलभ होता. आता शेतकरीही चौकोनी कुटुंबाचे महत्व जाणतो. त्याची मुले शाळा, कॉलेजात जातात. पुढे जमतील तशा नोकऱ्‍या करतात. अभ्यासात खूपच मागे राहणारा मुलगा शेतीत मदत करतो; पण तरीही लहानपणापासून शाळेत गेल्यामुळे त्याला कामाचे पारंपरिक शिक्षण आणि मेहनतीची सवय कमीच! पुढे मुलगी लग्न होऊन सासरी जाते आणि मुलगा चाकरमानी होणे पसंत करतो. आई-बाबा वाढत्या वयात काय, काय करणार? दाराशी असलेले बैल विकले जातात. कसायला घेतलेली शेती सोडून देतात आणि मोलमजुरी करून दिवस ढकलतात.
आता बैल नाहीत, म्हणून त्यांची जागा यंत्राने घेतली. बैल नाही तर चारा कशाला कापायचा? रान माजते. ते काढायला मजूर परवडत नाहीत, म्हणून तेथेही मशिन आले. पूर्वी गवताचे भारे बांधायला वेली काढून आणत. आता त्याऐवजी प्लास्टिक आले. आवारात, बागेत, वाटेत चारा, वेली बेसुमार वाढू लागल्या. ''वर घड आणि खाली रड'', अशी म्हण आता अनुभवायला मिळते. कारण उंच झाडावर माकडासारखे सर सर चढणारे तरुण दुर्मिळ झाले. आता म्हणे वानरांना प्रशिक्षण देणार. त्यांची संख्या आणि आक्रमकता वाढत आहे. घरावर ते कौल फोडतात, वर चढून कौल परतता येणारे काळाच्या पडद्याआड गेले. कौलाची जुनी ओटी पडवी असलेली घरे आता नामशेष होत आहेत. त्यांची जागा स्लॅबच्या घरांनी घेतली आहे. सारवलेल्या जमिनीऐवजी टाईल्स आल्या. कारणे अशी की, गोठा गेला, शेण मिळत नाही आणि परिणाम असा की, हिराची केरसुणी न खपता त्याऐवजी गवताचे झाडू गरजेचे झाले. चूल परवडत नाही, कारण लाकडे घरची असली तरी ती फोडायची मजुरी खूप! सिलेंडर स्वस्त! त्यामुळे राखेने भांडी घासणे, नारळ किशी त्यासाठी वापरतात, हेच पुढच्या पिढीला माहित नाही. जात्याची जागा आता घरघंटीने घेतली आणि घुंगरू वाजवत जाणारी बैलगाडी मुकी झाली. अशी ग्रामीण भागातील संस्कृती बदलत आहे. मानवी जीवन जगताना ते सुखावह होण्यासाठी बदल अपरिहार्य आहेत आणि ते स्वागतार्हही आहेतच. जुन्या-नव्याचा होत असलेला संगमही समजून घेण्यात मजा आहे. आगोटीच्या जेवणासाठी सर्वांना शुभेच्छा!
-----------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60238 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..