अंधांसाठी १जूनला गायन-वादन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधांसाठी १जूनला गायन-वादन स्पर्धा
अंधांसाठी १जूनला गायन-वादन स्पर्धा

अंधांसाठी १जूनला गायन-वादन स्पर्धा

sakal_logo
By

अंधांसाठी १ जूनला
गायन-वादन स्पर्धा
सावंतवाडी, ता. २१ ः नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, कोल्हापूर संस्थेमार्फत हेलन केलर स्मृतिदिनाचे औचित्य साधून १ जूनला अंधांच्या विभागीय सुगम गायन-वादन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा कोल्हापूर येथे होणार आहे. या स्पर्धेत दृष्टीबाधित स्पर्धकांना आपले गायन व वादन कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. संबंधित संस्था, शाळांनी अंध स्पर्धकांना याची माहिती देऊन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन अध्यक्ष प्रा. डॉ. मुरलीधर डोंगरे यांनी केले आहे. ही स्पर्धा शालेय व खुला अशा दोन गटांमध्ये होणार आहे. खुल्या गटात १८ ते ४० वयोगटातील अंध स्त्री-पुरुषांना सहभागी होता येईल. स्पर्धक व एका सहाय्यकाला प्रवास खर्च देण्यात येईल. प्रत्येक स्पर्धकास गीत सादर करण्यासाठी ४ मिनिटे वेळ असून, हार्मोनियम, तबला, ढोलकी, बोर्ड व साथीदार आदी संगीतसाथ आयोजकांतर्फे देण्यात येईल. स्पर्धकाने प्रवेश अर्जासोबत अंधत्व प्रमाणपत्राची झेरॉक्स पाठविणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज भरून पाठविण्यासाठी २५ मे ही अंतिम तारीख आहे. स्पर्धकांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60246 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..