चिपळूण ः स्मशानभूमीतील कामगार ठरणार चिपळूण भूषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः स्मशानभूमीतील कामगार ठरणार चिपळूण भूषण
चिपळूण ः स्मशानभूमीतील कामगार ठरणार चिपळूण भूषण

चिपळूण ः स्मशानभूमीतील कामगार ठरणार चिपळूण भूषण

sakal_logo
By

काही सुखद ः.लोगो
.....
''चिपळूण भूषण '' पुरस्काराचे आज वितरण

चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्सतर्फे आयोजन; नवोदित डॉक्टरासाठी नाट्यप्रयोग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चिपळूण स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ''चिपळूण भूषण '' पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. २२ मे रोजी रात्री साडेआठ वाजता आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते १० कामगारांना रोख रुपये २५ हजार आणि सन्मानचिन्ह देऊन या कामगारांना सन्मानित केले जाणार आहे.
१९९४ साली स्थापन झालेली चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही वैद्यकीय संघटना कोविड संक्रमणामुळे दोन वर्षे कर्तव्याप्रती दक्ष राहिली. यावर्षी संघटना २५ वा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा करत आहे. या निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रम होतील. संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरूण पाटील म्हणाले, यावर्षी सीजीपीएने वर्षभरात विविध उपक्रम घेतले. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (ता. २२) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत चिपळूणमधील बांदल हायस्कूल येथे महाआरोग्य शिबिर होईल. चिपळूणमधील सर्व नामांकित हॉस्पिटल्ससह कोल्हापूर येथील डॉ. प्रभू, डॉ. सचिन कुलकर्णी, अंतरंग हॉस्पिटल, सुनंदा हॉस्पिटल, मिरजेचे सिनर्जी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने विविध विकारांवर रुग्णांना एकाच ठिकाणी तज्ञ वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे.
..
चौकट
नाट्यप्रयोगातून मिळणारी रक्कम पूरग्रस्त डॉक्टरांना देणार
महापुरात अडचणीत आलेल्या नवोदित डॉक्टरांना मदत करण्याच्या हेतूनेच ''श्रीमंत दामोदर पंत'' या नाटकाचा प्रयोग २२ मे रोजी रात्री ९ वा. शहरातील बांदल हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे. या नाट्यप्रयोगातून मिळणारी रक्कम पूरग्रस्त डॉक्टरांसाठी मदत म्हणून दिली जाणार आहे. न. ए. सोसायटीचे चेअरमन बाबू तांबे, डीबीजेचे प्राचार्य एन. एस. गवाळे, प्रा. दवणे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
-------
चौकट
ईश्वरला प्रसन्न करण्यासाठी
कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुस्लिम समाजातील लोकांना मुस्लिम विधीप्रमाणे दफन करण्यात आले. या कामी ज्यांनी योगदान दिले, त्यांचाही या वेळी गौरव होईल. परंतु आम्ही जे केले ते ईश्वरला प्रसन्न करण्यासाठी केले. त्यामुळे आम्हाला प्रसिद्धी किंवा अन्य काहीही नको, अशी भूमिका चिपळूण भूषणप्राप्त मुस्लिम कामगारांनी ''सकाळ''कडे मांडली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60258 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..