दाभोळ ः तलावातील मत्स्योत्पादन वाढवण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः  तलावातील मत्स्योत्पादन वाढवण्याची गरज
दाभोळ ः तलावातील मत्स्योत्पादन वाढवण्याची गरज

दाभोळ ः तलावातील मत्स्योत्पादन वाढवण्याची गरज

sakal_logo
By

आधुनिक तंत्रज्ञान वापरा, मत्स्योत्पादन वाढवा

डॉ. शिनगारे यांचे आवाहन; गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीत संधी
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २१ ः महाराष्ट्रातील तलावातून होणारे सरासरी मत्स्योत्पादन १. ५ टन/हेक्टर एवढेच असून, ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा अत्यल्प असल्याने मस्त्य संवर्धनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवा, असे आवाहन मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी महोत्सवात गोड्या पाण्यातील मत्स्यशेती-आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरील परिसंवादात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी डॉ. केतन चौधरी, डॉ. सुरेश नाईक उपस्थित होते. डॉ. शिनगारे यांनी तलावातील मत्स्यसंवर्धनाच्या आधुनिक पद्धती विषद करत विद्यापिठाने विकसित केलेले भातशेतीतील मस्त्यसंवर्धन तंत्रज्ञान, पिंजऱ्यातील शोभिवंत माशांचे उत्पादन या तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले तर तिलापिया वर्धन, पंगत माशांचे संवर्धन, एकात्मिक संवर्धन, वाढ खुंटलेल्या बोटुकलीचे उत्पादन व संवर्धन यावर मार्गदर्शन केले.
रत्नागिरीचे सहाय्यक मस्त्य व्यवसाय आयुक्त नवनाथ भादुले यांनी, गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसंबंधी विविध शासकीय योजनांसंबधी विस्तृत माहिती देत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, कुलगुरु डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार शिक्षणसंचालक डॉ. संजय भावे यांनी भेट दिली. या वेळी आमदार केसरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना डॉ. शिनगारे यांनी उत्तरे दिली. आमदार केसरकर यांनी गोड्या पाण्यातील शेतीकडे लक्ष देणे ही काळाची गरज असून, त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे मत व्यक्त केले.
-------------------
चौकट
मासे संगोपन केल्यास अधिक फायदा
प्रा. डॉ. शशिकांत मेश्राम यांनी जैवपुंज तंत्रज्ञान संकल्पना विषद करत त्यात कार्बन, नत्रस्त्रोत कोणते वापरावे, मोजमाप कसे करावे, कोणते मासे संगोपन केल्यास अधिक फायदा मिळतो याचे विवेचन केले. प्रा. डॉ. बी. आर. चव्हाण यांनी जलाशयातील पिंजरा संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करताना पिंजरा संवर्धन संकल्पना महाराष्ट्र शासनाची विविध मार्गदर्शक तत्त्वे, माशांचे खाद्य, आरोग्य व्यवस्थापन यावर ऊहापोह करत लांजा, कडवई, जि. रत्नागिरी व अहमदनगर येथील पथदर्शक पिंजरा संवर्धन प्रकल्पाची यशकथा विषद केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60314 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..