चिपळूण ः चिपळुणात आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन लागले कामाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळुणात आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन लागले कामाला
चिपळूण ः चिपळुणात आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन लागले कामाला

चिपळूण ः चिपळुणात आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन लागले कामाला

sakal_logo
By

चिपळूण तालुकाः लोगो
..
फोटो - RATCHL213.JPG ः चिपळूण ः तिवडी येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी आदी.
२३४७४
...........
पावसाळ्यापूर्वी प्रशासन लागले कामाला

३२ कुटुंबांच्या स्थलांतराच्या सूचना; पंचायत समितीत आज प्रशिक्षण
चिपळूण, ता. २१ ः जुलै व ऑगस्ट २०१९ व जुलै २०२१ या कालावधीत तालुक्यातील विविध ठिकाणी पडलेल्या भेगा तसेच डोंगर खचल्याने धोकादायक असलेल्या गावांचे भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षण केले होते. त्यांनी काही गावातील वाड्यांचे स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या उपाययोजनेचा भाग म्हणून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आकले निबारेवाडी, ओवळी धनरवाडीतील १९ कुटुंबांना घरे बांधून देण्यात आली. धोकादायक ठिकाणी प्रशासनाने पाहणी केली असून, आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून तालुका प्रशासन कामाला लागले आहे.
भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्व्हेक्षणात दुर्गम भागातील ३२ कुटुंबांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच स्थलांतराबरोबर सरंक्षक भिंती, बांबू लागवड आदी सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांचे पुर्नवसन केले जात आहे. ३२ पैकी १९ कुटुंबांना घरे देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी उपाययोजनेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी मंडळ अधिकारी, संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक व तलाठींसमवेत कळकवणे, ओवळी, राधानगर स्वयंदेव, तिवडी, तिवरे या गावांत भेटी देऊन ग्रामस्थांबरोबर चर्चा केली.
अतिवृष्टी काळातील पूर्वतयारीबाबत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये उपाययोजनेचा भाग म्हणून आकले निबारेवाडी, ओवळी धानवाडी, धनगरवाडी येथील दुर्गम डोंगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून १९ घरे बांधण्यात आली आहेत.
तिवडी ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाच्या रस्त्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्यांनतर प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित विभागाचे प्रमुख उपअभियंता माने यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तिवरे व इतर गावातील निवारा केंद्रे, वीज, पाणी, स्वच्छतागृहासह तयार ठेवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत. कळकवणे-दादर पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले.
..
चौकट
उपाययोजना करा..
तिवरे गावात डोंगरउतारावरील पाण्याच्या प्रवाहामुळे घरांचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागास केल्या. याचाच भाग म्हणून दरडग्रस्त भागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चिपळूण पंचायत समितीत २३ मे ला रोजी दुपारी बारा वाजता प्रशिक्षण होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60356 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..