रत्नागिरी ः अत्याधुनिक एमआरआरआय मशिन चिरायुत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः अत्याधुनिक एमआरआरआय मशिन चिरायुत
रत्नागिरी ः अत्याधुनिक एमआरआरआय मशिन चिरायुत

रत्नागिरी ः अत्याधुनिक एमआरआरआय मशिन चिरायुत

sakal_logo
By

अत्याधुनिक एमआरआरआय मशिन ‘चिरायु‘त

भारतातील पाहिले मशीन; कमी कालावधीत अचूक निदान

रत्नागिरी, ता. २१ ः कमी कालावधीत व अचूक माहिती मिळून अतिशय क्लिष्ट आणि गंभीर व्याधींचे निदान रत्नागिरीतच करता यावे यासाठी चिरायु हॉस्पिटलमध्ये हिताची व फुजी कंपनीचे एचलोन स्मार्ट एमआरआय स्कॅन मशीन बसवण्यात आले आहे. सिनर्जी ड्राईव्ह या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित फुजी कंपनीचे हे मशीन भारतातील पाहिले आहे, अशी माहिती चिरायु हॉस्पिटलच्या संचालकांनी पत्रकार परिषदेत दिली.
फिजिशियन डॉ. सचिन यादव, डॉ. श्रीविजय फडके, आनंद फडके आणि राकेश चव्हाण उपस्थित होते. डॉ. यादव म्हणाले, अचूक न्यूरो विभागासाठी अत्यंत आवश्यक हिताची व फुजी कंपनीचे एचलोन स्मार्ट एमआरआय स्कॅन मशीन ज्यात सिनर्जी ड्राईव्ह ही अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे असे चिरायुत बसवले आहे. कमी कालावधीत व अचूक माहिती मिळून अतिशय क्लिष्ट आणि गंभीर व्याधींचे निदान करणे सोपे होणार आहे. यातील आवाजाची तीव्रता ९४ टक्के कमी करून व सुस्पष्ट स्कॅनची छायाचित्रे प्राप्त होतील. शरीरातील खोलवर व्याधी व मानवी दृष्टीसाठी अशक्यप्राय आजार याचे बिनचूक निदान करून त्यावर उपचार करता येतील.
आनंद फडके म्हणाले की, गेली अनेक वर्षे कोकणातील जनतेने चिरायुच्या सर्व उपक्रमांना पाठिंबा दिला, हे लक्षात घेऊन नवीन एमआरआय स्कॅनच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. एमआरआयच्या तपासण्यांसाठी रुग्णांना कोल्हापूर, पुणे अथवा मुंबईत जावे लागते; परंतु या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व प्रकारच्या तपासण्या रत्नागिरीतच होतील.
------------------------------
चौकट
कॉन्ट्रास्टचे इंजेक्शन न देता तपासणी
डॉ. फडके म्हणाले, या मशिनद्वारे मेंदू व शरीरातील रक्तवाहिन्यांची कोणतेही कॉन्ट्रास्टचे इंजेक्शन न देता तपासणी, एमआर स्पेक्ट्रोस्कोपिद्वारे मेंदूतील ट्यूमरच्या पेशी व निरोगी पेशी यांच्या वेगवेगळ्या प्रतिमा दाखवून रोगनिदान सुलभतेने होते. एमआरसीपीद्वारे यकृत व पित्ताशयाच्या विविध विकारांची इंजेक्शन न देता तपासणी होते. मणक्यांमधील गाठी, चकतीमुळे पडलेला नस किंवा शिरेवर दाब व त्यामुळे उद्भवणारे आजार या सर्वांची तपासणी कर्करोगाच्या गाठी व त्याचा इतर अवयवांत झालेला प्रसार याचे निदान. विविध सांधे, खांदा, गुडघा, कमरेचा खुबा व लहान सांधे यांच्या व्याधींचे अचूक निदान आणि पचनसंस्था, मज्जासंस्था व रक्ताभिसरण संस्था यांची समग्र तपासणी करता येणार आहे.

---
चौकट

मशिनची वैशिष्ट्ये

स्मार्ट कम्फर्ट सर्वात मोठी कॅप्सूल व अत्यंत कमी आवाज हे आहे. स्मार्ट क्वालिटी हायडेफिनेशन, सुस्पष्ट इमेजेस व अचूक निदान यामध्ये होणार आहे. स्मार्ट स्पीड नेहमीच्या स्कॅनपेक्षा निम्म्या वेळेत स्कॅन करणे शक्य होईल, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

..

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60375 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..