आजीवन अध्ययन विभागातून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजीवन अध्ययन विभागातून
विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे
आजीवन अध्ययन विभागातून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे

आजीवन अध्ययन विभागातून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे

sakal_logo
By

23491
दोडामार्ग ः प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांचा सत्कार करताना प्रा. डॉ. कुणाल जाधव, गौतम गायकवाड, प्रशांत कांबळे, प्रा. यू. टी. परब आदी.

‘आजीवन अध्ययन’मधून संधी

प्रा. जाधव ः दोडामार्ग महाविद्यालयात वार्षिक मूल्यमापन सत्र

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २१ ः आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांनी अनेक संधी प्राप्त केल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळाले आहेत. विद्यार्थी स्वावलंबी बनविण्याचे कार्य या विस्तार विभागातून होत आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या विभागात सहभागी झाले पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. कुणाल जाधव यांनी व्यक्त केले.
येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित वार्षिक मूल्यमापन सत्रात ते बोलत होते. यावेळी किरण पाटील, सचिन राऊत, गौतम गायकवाड, प्रशांत कांबळे व क्षेत्र समन्वयक प्रा. यु. टी. परब उपस्थित होते. डॉ. कुणाल जाधव यांनी डी.एल.एल.ई. विभागाच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राबविलेले उपक्रम आणि शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांचा डी.एल.एल.ई. विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या डी.एल.एल.ई. विभागाचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ‘उडान फेस्टिव्हल’ व प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. विस्तार कार्यशिक्षक प्रा. एस. एस. पाडगावकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रीती प्रसादी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60413 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..