
सेंद्रीय शेतीच्या स्टॉलचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
23650
कुडाळ ः लक्ष्मीकृपा इंटरप्रायझेस स्टॉलला भेट दिल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत, सीईओ प्रजित नायर आदी.
सेंद्रीय शेतीच्या स्टॉलचे
पालकमंत्र्यांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः मानव जातीला व्याधीमुक्त व निरोगी जीवन जगण्यासाठी सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. दोडामार्ग येथील लक्ष्मीकृपा इंटरप्रायझेसचे बापू गवस गेली पाच वर्षे वेस्टीज कंपनीच्या माध्यमातून सेंद्रीय विषमुक्त शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी सिंधू कृषी मेळाव्यात त्यांनी लावलेल्या स्टॉलला पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भेट देऊन कौतुक केले. सिंधुदुर्गसह गोवा, कर्नाटक येथे गवस यांच्यामार्फत विषमुक्त शेती अभियान राबविले जात आहे. त्यासाठी राजेश मणेरीकर, रितू मणेरीकर, वीणा हळदीकर, सुरभी गवस, प्रणवी राऊळ, मंजुषा चव्हाण यांचे सहकार्य लाभत आहे. वेस्टीज कंपनीचे दाभोळकर सर, रसिका मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. कृषी मेळावा स्टॉलमार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आजी-माजी कृषी अधिकाऱ्यांकडून त्यांना सहकार्य लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60494 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..