
‘एमबीबीएस’मध्ये जुई निगुडकरचे यश
23601
जुईसमवेत वडील डॉ. संजय निगुडकर, आई सुमेधा.
‘एमबीबीएस’मध्ये
जुई निगुडकरचे यश
कुडाळ, ता. २२ ः कुडाळ हिंदू कॉलनी येथील जुई निगुडकर ही के.ई.एम हॉस्पिटल व सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजच्या एम. डॉक्टरीच्या एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा ७३.११ टक्के मिळवून उत्तीर्ण झाली.
सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व संलग्न के.ई.एम हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एक नंबरचे अग्रणीय कॉलेज व हॉस्पिटल समजले जाते. तेथे एम.बी.बी.एस.च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी तीव्र चुरस असते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी प्रथम प्राधान्याने वैद्यकीय शिक्षणासाठी तेथे प्रवेश घेतात. जुईने तिचे प्रायमरी व सेकंडरी शिक्षण येथील कराची महाराष्ट्रीयन शिक्षण कुडाळ प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूलच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलमधून केले. २०१४ मध्ये ती दहावीमध्ये इंग्लिश माध्यमातून सिंधुदुर्गातून प्रथम आली होती. शिवाय तेथून चौथी व सातवीच्या शिष्यवृत्तीही तिने मिळविल्या होत्या. त्यापुढे अकरावी, बारावीचे शिक्षण मुंबईत करून ती मेडिकल कॉलेज प्रवेश परीक्षा, ऑल इंडिया नीटच्या परीक्षेत सुयश मिळवून ऑल इंडिया व महाराष्ट्रातून अव्वल रॅंक मिळविला. त्यानंतर के.ई.एम हॉस्पिटल व जी.एस. मेडिकल कॉलेज येथे प्रवेश मिळविला होता. आता इंटर्नशिप संपल्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑल इंडिया प्रवेश परीक्षा देणार असून ‘नेत्रशल्यचिकित्सा’ या विषयाकडे तिचा विशेष कल असल्याचे तिने सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60498 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..