
कोलगाव येथे 26 पासून त्रैवार्षिक पडली उत्सव
L23684
- श्री देवी सातेरी
कोलगाव येथे २६ पासून
त्रैवार्षिक पडली उत्सव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः कोलगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थानचा वार्षिक पडली उत्सव २६ ते ३० मे दरम्यान होत आहे. यानिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
गुरुवारी (ता. २६) सायंकाळी ४ वाजता कुळघराकडून (चंदन धुरी) तरंग काठीसह सवाद्य श्री देवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम, शुक्रवारी दुपारी २ वाजता सातेरी मंदिराकडून तरंग काठीसह चव्हाटा येथून श्री दिर्बादेवीच्या भेटीसाठी प्रस्थान आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर धार्मिक विधी, मानपान, नवस फेड आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ९ वाजता महाप्रसाद, त्यानंतर दिर्बा देवी मंदिराकडून तरंग काठीसह चव्हाटा येथे प्रस्थान व मुक्काम होणार आहे. शनिवारी सकाळी १० वाजता पडली भरण्याचा पारंपरिक कार्यक्रम, त्यानंतर भाविकांच्या पडलीमध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ वाजता देवतांना आवाहन केल्यानंतर भाविकांची गाऱ्हाणी व नवस बोलण्याचा कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वाजता सुधाकर दळवी प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता देवतांना आवाहन, भाविकांची गाऱ्हाणी व नवस बोलणे, त्यानंतर भाविकांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वाजता श्री वाळवेश्वर दशावतार नाट्यमंडळ (तेंडोली) यांचे नाटक होणार आहे. सोमवारी सकाळपासून भाविकांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम, सकाळी १० वाजता देवतांना आवाहन, भाविकांना आशीर्वाद, त्यानंतर कोलगाव येथील दादा सावंत (पुणे) यांच्या सौजन्याने महाप्रसाद, दुपारी २.३० वाजता देवतांना आवाहन, देवतांसह पडलीचे महादेवाचे केरवडे येथे प्रस्थान होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी, स्थानिक देवस्थान कमिटी व कोलगाव ग्रामस्थांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60555 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..