राजापूर-प्रगतशील शेतकरी जानस्करांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-प्रगतशील शेतकरी जानस्करांचा गौरव
राजापूर-प्रगतशील शेतकरी जानस्करांचा गौरव

राजापूर-प्रगतशील शेतकरी जानस्करांचा गौरव

sakal_logo
By

-rat22p27.jpg
23714
-राजापूर ः कृषी पुरस्काराने चंद्रकांत जानस्कर यांचा गौरव करताना खासदार विनायक राऊत.
------------
प्रगतशील शेतकरी जानस्करांचा गौरव
राजापूर, ता. २२ : जिल्हा कृषी विभागातर्फे झालेल्या रत्न कृषी मेळाव्यामध्ये खरीप हंगामातील भातपिक स्पर्धेमध्ये भाताचे लक्षवेधी उत्पादन घेणारे कोतापूर येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत जानस्कर यांना कृषी विभागातर्फे गौरविण्यात आले. मका, लसूण यांच्यासह औषधीयुक्त काळ्या तांदुळाची त्यांनी यशस्वी लागवड केली आहे.
रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये श्री. जानस्कर यांना खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने आदी उपस्थित होते. नोकरीच्या शोधार्थ बाहेर जाण्याऐवजी आपल्या शेतीमध्येच नवनवीन प्रयोग करीत यशस्वीरित्या शेती केल्यास त्यातून आर्थिक उन्नती करणे शक्य आहे, याची जाणीव असलेले श्री. जानस्कर गेल्या काही कित्येक वर्षापासून शेती करीत आहेत. त्यामध्ये त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून साऱ्‍यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यामध्ये त्यांनी शेतीतील पारंपरिक पिके घेताना मका, लसूण, भुईमूग, सुर्यफूल लागवडीसह औषधी म्हणून ओळखल्या जात असलेल्या काळ्या तांदुळाचीही यशस्वीरित्या लागवड केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60593 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top