
चिपळूण-‘लोटिस्मा’त मुक्तद्वार वाचन विभागाचे उद्घाटन
‘लोटिस्मा’त मुक्तद्वार वाचन विभागाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ः येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या मुक्तद्वार वाचन विभागाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आणि शहरातील प्रथितयश डॉक्टर यतीन जाधव आणि अविनाश पोंक्षे यांच्या हस्ते झाले.
वाचनालयातील ग्रंथसंख्या ७५ हजारावर गेली आहे. वाचनालयास पुस्तके ठेवायला जागा अपुरी पडते आहे. त्यामुळे वाचनालयाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन विभागातील जागा आता ग्रंथ ठेवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. वाचनालयाच्या आप्पासाहेब साठे इमारतीच्या जिन्याच्या खालील भागात मुक्तद्वार वाचन विभाग सुरू करण्यात आला आहे. मुक्तद्वार वाचन विभागाची वेळ सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ७ असणार आहे. दर बुधवारी ग्रंथालयाच्या सुट्टीच्या दिवशी मुक्तद्वार बंद राहील. उद्घाटनप्रसंगी प्रकाश देशपांडे, डॉ. सौ. रेखा देशपांडे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, उपाध्यक्ष सुनील खेडेकर, कार्यवाह विनायक ओक आणि संस्थेचे संचालक उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60613 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..