खेड-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-संक्षिप्त पट्टा
खेड-संक्षिप्त पट्टा

खेड-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

तायक्वॉंदो स्पर्धेत खेडचे सुयश
खेड ः जिल्हास्तरीय ओपन चॅलेंज तायक्वॉंदो स्पर्धेत खेड येथील खेळाडूंनी यश मिळवले आहे. राजापूर येथील यशोदिन सृष्टी पाटीलमळा या ठिकाणी सब-ज्युनियर, कॅडेट, ज्युनियर , सिनियर अशा वयोगटात झाल्या. या स्पर्धेमध्ये खेड तायक्वॉंदो स्पोर्टस् अॅकॅडमी अंतर्गत सुमारे ७० खेळाडूंनी सहभाग नोदविला. स्पर्धेतील पदक विजेते असे ः सुवर्णपदक- आयुश फावरे, श्रीनिवास आंबडेकर, सार्थक बाईत, परीधी माळी, स्वतिका मुद्राळे, अर्जून आंब्रे, आर्या आंब्रे, जैद हमदुले, समर्थ सकपाळ, सिद्धार्थ वायकर, हर्षदा पार्टे, अक्षय पोळ. रौप्यपदक- सोहम हुमणे, फरहान पठाण, तनिष्क निगडेकर, अक्षरा नायनाक, अक्षरा देसाई, विक्रांत सागवेकर, आयुश फावरे, ईजियान पेडेकर, प्रशिल जाधव, सिद्धी बेंडुगडे, सोहम खामकर. कास्यपदक- अनुष्का रोकडे, सनिधी शेट्टी, दीपिका हलदर, साहिल मोरे, स्वराज्य आंब्रे, आर्या आंब्रे, मानस शिंदे, काव्या खानविलकर, अभिजित कदम, शुभम देसाई, वेदा लाड, सृष्टी भुवड, श्रीतेज भुवड, तेजस भैरवकर.
------------------
शामसुंदर दळवी यांची निवड
खेड ः तालुका नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्षपदी मुरडे येथील शामसुंदर दळवी, उपाध्यक्षपदी धामणंद येथील ज्ञानेश्वर शिंदे तर सचिवपदी खवटी येथील रामदास पवार यांची निवड करण्यात आली. वार्षिक सभेमध्ये २०२२ ते २०२५ या सालासाठी ही नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून अमित पवार (शिर्शी), दीपक निकम (माणी), दीपक शिंदे (धामणंद), रामदास पवार (खवटी), नागेश दळवी (नांदगाव), ज्ञानेश्वर चव्हाण (कोरेगाव), शरद चव्हाण (भडगाव), दिनेश चव्हाण (सुकिवली), समीर पवार (शिव), शेखर पवार (खोपी), संदेश शिंदे (नातूनगर) अशी अकरा जणांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून महादेव चव्हाण (सुकीवली), दीपक माने (लवेल), अमोल दळवी (नादगाव), संजय पवार (खेड) व प्रशांत दळवी (नांदगाव) या पाच जणांची निवड करण्यात आली आहे.
-------------
खेडमध्ये बांबू व फळबाग लागवड कार्यशाळा
खेड ः येथील मराठा भवन येथे बांबू व फळबाग लागवड कार्यशाळेचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते झाला. कार्यशाळेचा लाभ खेड, दापोली, मंडणगड व चिपळूण येथील शेतकऱ्यांनी घेतला. कार्यक्रमाला उपाजिल्हाधिकारी श्रीमती अमिता तळेकर, खेड प्रांताधिकारी श्रीमती राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, सुशांत पाटील, माजी सभापती चंद्रकांत कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60615 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top