
''दाखला आपल्या दारी''ला मळेवाड येथे प्रतिसाद
23729
मळेवाड ः शिबिराचा प्रारंभ करताना सरपंच पार्सेकर आदी. (छायाचित्र ः धनश्री मराठे)
मळेवाडला ‘दाखला आपल्या दारी’
शिबिराला प्रतिसाद; ग्रामस्थांसाठी सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. २२ ः ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरे येथे ‘दाखला आपल्या दारी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा प्रारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला.
सावंतवाडी तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेत असताना लागणारे शासकीय दाखले सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी उपसरपंच हेमंत मराठे, सदस्य महेश शिरसाट, तात्या मुळीक, सानिका शेवडे, मंडल अधिकारी कोदे, तलाठी श्री. पास्ते, तलाठी श्री. गोरे, तलाठी श्री. नागराज, परशुराम मुळीक, प्राची मुळीक, तात्या परब आदी उपस्थित होते. या शिबिरामुळे प्रवेश घेत असताना दाखल्यांसाठी होणारी धावपळ आणि येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत, असे मत उपसरपंच मराठे यांनी व्यक्त केले. याहीपुढे महसूल विभागाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत व ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावात विविध उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, ए.डब्ल्यू.एस., वय, अधिवास, नागरिकत्व, नॉन क्रिमिलेअर, डोंगरी आदी विविध दाखले दाखल करून घेण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60616 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..