
आरोसबागमध्ये दारु वाहतुक रोखली
23752
बांदा ः मुद्देमाल व संशयितसाह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी.
23753
बांदा ः जप्त केलेली मोटार. (छायाचित्रे ः निलेश मोरजकर)
आरोसबागमध्ये दारु पकडली
सावंतवाडीतील एक ताब्यात; मोटारीसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः गोवा बनावटीच्या दारूची मोटारीतून बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने आरोसबाग येथे कारवाई करत २ लाख १५ हजार ५२० रुपये किमतीच्या दारुसह एकूण ५ लाख ६५ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकारणी मोटार चालक मनवेल कैतान डिसोझा (रा. सावंतवाडी ) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई काल (ता.२१) रात्री उशिरा झाली.
सविस्तर माहिती अशी की, गोव्यातून आरोसबाग मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोटारीतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपाधीक्षक आर. ए. इंगळे, निरीक्षक एस. पी. मोहिते, दुय्यम निरीक्षक टी. बी. पाटील, पी. एस. रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जगन चव्हाण, शाहूवाडी निरीक्षक एन. एस. देवणे, दुय्यम निरीक्षक एस. बी. यादव यांच्या पथकाने आरोसबाग येथे रात्री उशिरा सापळा रचला होता. गोव्यातून आरोसबाग येथे येणाऱ्या स्विफ्ट मोटारीला (एमएच ४८ ए ६५०६) तपासणीसाठी थांबविली.
--
डीकीत बेकायदा साठा
मोटारीच्या मागील डिकीत व सीटवर गोवा बनवटीच्या दारूचा बेकायदा साठा आढळला. पथकाने विदेशी मद्याचे व बियरचे २ लाख १५ हजार ५२० रुपये किमतीचे ४२ खोके व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची मोटार असा मुद्देमाल जप्त केला. संशयित चालकास ताब्यात घेण्यात आले. अधिकारी तपास दुय्यम निरीक्षक टी. बी. पाटील करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60630 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..