रत्नागिरी- सरखेल आंग्रेंच्या आठवणी पुन्हा जाग्या- रघुजीराजे आंग्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सरखेल आंग्रेंच्या आठवणी पुन्हा जाग्या- रघुजीराजे आंग्रे
रत्नागिरी- सरखेल आंग्रेंच्या आठवणी पुन्हा जाग्या- रघुजीराजे आंग्रे

रत्नागिरी- सरखेल आंग्रेंच्या आठवणी पुन्हा जाग्या- रघुजीराजे आंग्रे

sakal_logo
By

-rat22p26.jpg
23713
- भाट्ये (रत्नागिरी) : येथे समुद्रसेनानी मायाजी भाटकर व बालयोद्धा वीर हरजी भाटकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर रघुजीराजे आंग्रे, सौ. भैरवी आंग्रे, अॅड. विलास पाटणे, कॅप्टन दिलीप भाटकर, पराग भाटकर, प्रभाकर भाटकर, प्रकाश भाटकर आदी.
--------------
सरखेल आंग्रेंच्या आठवणी झाल्या जाग्या

रघुजीराजे व कुटुंबीय मायाजी भाटकर यांच्या समाधीपुढे नतमस्तक
सकाळ वृततसेवा
रत्नागिरी, ता. २२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील आरमारातील समुद्रसेनानी मायाजी भाटकर आणि त्यांचा पुतण्या बालयोध्दा वीर हरजी भाटकर यांनी अतुलनीय शौर्य गाजवले आहे. त्यांच्या भाट्ये येथील समाधीस्थळी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नवव्या पिढीतील वंशज रघुजीराजे व कुटुंबीयांनी आज वंदन केले. या समाधीस्थळी भेट दिल्यावर माझ्या पूर्वजांच्या स्मृती पुन्हा एकदा जाग्या झाल्या, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.
आज ता. २२ रोजी दुपारनंतर रघुजीराजे आंग्रे यांनी कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर अॅड. पाटणे यांच्यासमवेत ते भाट्ये येथे मायाजी भाटकर यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. याप्रसंगी कॅप्टन दिलीप भाटकर यांच्यासमवेत सरपंच आणि मायाजी भाटकर यांच्या १३ व्या पिढीतील वंशज उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांचे दर्यावरचे मायनाक (मायाजी) भंडारी हे तर छत्रपतींच्या आरमाराचे पहिले प्रमुख होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील हेटकरी पायदळाने पुरंदर आणि वसईच्या लढाईत पराक्रमाची शर्थ केली. समुद्रसेनानी मायनाक भंडारी तथा मायाजी भाटकर आणि त्यांचा पुतण्या बालयोध्दा वीर हरजी भाटकर यांनी हिंदवी स्वराज्याच्या मोहिमेत असामान्य पराक्रम गाजविल्याची नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातही हरजी भाटकर, मायनाईक भाटकर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुवर्णदुर्ग मोहिमेवेळी मायनाक भंडारी व हरजी भंडारी यांना वीरमरण आले. परंतु सुवर्णदुर्ग अखेर स्वराज्यात दाखल केला. त्यांचा हा इतिहास कॅ. भाटकर यांनी सांगितला. रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरही सरखेल कान्होजी आंग्रे यांचे छोटे स्मारक असून यातील पुतळा भाट्याच्या सुपुत्राने साकारल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी भैरवी आंग्रे, जय अर्जुन, गायत्री आग्रे व कुटुंबीय, माजी सरपंच पराग भाटकर, सेनानी मायाजी भाटकर कुटुंबातील प्रभाकर भाटकर, प्रकाश भाटकर, इतिहास संकलक संदीप फणसेकर आदी उपस्थित होते.
-------------
चौकट 1
४ जुलैला सरखेल आंग्रेंचा स्मृतीदिन
येत्या ४ जुलैला सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने गोवा, कोकण, गुजरातमधून दुचाकीस्वार समुद्री महामार्गावरील प्रत्येक गावांत गावचा उज्ज्वल इतिहास, जैवविविधता आणि किल्ले संवर्धनाचा संदेश देत अलिबागला पोहोचून तिथे सरखेल आंग्रे यांना मानवंदना देतील. याकरिता रत्नागिरीतूनही दुचाकीस्वारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रघुजीराजे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60635 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top