खेड : पत्नीची अब्रू वाचविणाऱ्या पतीला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाण
खेड-पत्नीची अब्रू वाचविणाऱ्या पतीला मारहाण

खेड : पत्नीची अब्रू वाचविणाऱ्या पतीला मारहाण

खेड - महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला पतीने रोखले असता, पतीच्या डोक्यात ओंडका घालून अनोळखी व्‍यक्‍तीने पलायन केले. यात पती गंभीर जखमी झाल्याने त्याला रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले. येथील नजीकच्या भरणे येथे हा प्रकार घडला. अनोळखी इसमाचा शोध पोलिस घेत आहेत. शनिवारी (ता. २१) गुन्हेगाराला शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले होते.

घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २१) पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास भरणे नाका येथील काळकाई देवी मंदिराच्या आवाराबाहेरील मोकळ्या जागेमध्ये जोगवा मागणारे एक जोडपे वास्तव्यास होते. ते झोपलेले असताना एका अनोळखी इसमाने त्या ठिकाणी येऊन त्या महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेच्या नवऱ्याला जाग आली. त्याने त्या व्यक्तीला तिथून हाकलले. त्यानंतर थोड्यावेळाने तो इसम पुन्हा त्या ठिकाणी आला. त्याने महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या नवऱ्याने त्याला प्रतिकार केला. याचा राग येऊन त्याने पतीच्या डोक्यात लाकडाने आघात केला. या हल्ल्यात महिलेचा पती गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध पडला. महिलेने आरडाओरडा केल्यामुळे त्या अनोळखी व्यक्तीने तेथून पळ काढला. भरणे येथील काही नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी जखमी इसमावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवले. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन शनिवारी दिवसभर वेगाने तपासचक्र फिरवण्यास सुरुवात केली आहे. भरणे परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू केले आहे. गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी श्वानपथक देखील बोलावण्यात आले होते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60637 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top