
एक टन वजनाची महाघंटा
01881
जोतिबा डोंगर : येथील मंदिर परिसरात अर्पण करण्यासाठी पंचधातूची एक टनाची महाघंटा.
जोतिबा डोंगरावर बसविणार
एक टन वजनाची महाघंटा
सांगलीच्या भाविकाकडून अर्पण; शुक्रवारी विधीपूर्वक प्रतिष्ठापना
निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. २२ ः जोतिबा मंदिराच्या आवारात शुक्रवारी (ता. २७) एक टन वजनाची पंचधातूची महाघंटा बसणार आहे. पलूस-बुर्ली (जि. सांगली) येथील भाविक सर्जेराव हिंदूराव नलवडे हो स्वखर्चाने बनवलेली ही महाघंटा ‘श्री’ चरणी अर्पण करणार आहेत. घंटेची उंची ४४ इंच व रुंदी ४० इंच म्हणजे पावणेचार फूट उंच ही घंटा असून, यासाठी पंचधातू वापरला आहे. या घंटेचा ३६० अंश कोनात लंबक तयार केला आहे.
श्री. नलवडे जोतिबा देवाचे निस्सीम भक्त दर रविवारी व पौर्णिमेदिवशी डोंगरावर येतात. २००० मध्ये त्यांनी यापूर्वीची महाघंटा बसविली होती. गेल्या वर्षी ही घंटा तडे गेल्याने खराब झाली होती. श्री. नलवडे यांना हे समजताच त्यांनी नवीन घंटा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पलूस येथील केदार मेटल फौंड्रीत या महाघंटेचे काम सुरू केले. महाघंटेचे काम अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळी साडेनऊला ही महाघंटेची देवबावी तलावाच्या पश्चिम बाजूच्या जागेवर विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या वेळी महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे पुजारी अशोक बुणे यांनी सांगितले.
कोट
गीनिज बुकात नोंद होण्यासारखी ही महाघंटा असून, ही तयार करताना आध्यात्मिक व विज्ञानाचाही वापर केला आहे. या घंटेला पंचधातू वापरल्याने आवाज चांगला आहे. गेल्या वर्षी घरी कोरोनाचे आठ रुग्ण होते. पण, देवाच्या कृपेने सर्व सुखरूप आहेत. देवाने सेवा करण्याची संधी दिली. शुक्रवारी महाघंटा अर्पण करणार आहे.
- सर्जेराव नलवडे, पलूस-बुर्ली (जि. सांगली)
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60675 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..