‘विधीलेख’मधील महिला कलाकारांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विधीलेख’मधील महिला कलाकारांचा गौरव
‘विधीलेख’मधील महिला कलाकारांचा गौरव

‘विधीलेख’मधील महिला कलाकारांचा गौरव

sakal_logo
By

23817
कणकवली ः ‘विधीलेख’ नाटकातील कलाकारांचा सन्मान करताना जनजागृती सेवा समितीचे पदाधिकारी.


‘विधीलेख’मधील महिला कलाकारांचा गौरव

कणकवलीतील सोहळा; जनजागृती सेवा समितीचा पुढाकार

कणकवली,ता. २३ ः जनजागृती सेवा समितीच्यावतीने ‘विधीलेख’ या महिला दशावतार नाटकातील कलाकारांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. श्रीदेव ब्राह्मणेश्वर मंदिर मित्रमंडळ, कणकवली वरचीवाडी येथे हा नुकताच प्रयोग झाला होता. यावेळी सिंधुरत्न फाउंडेशन महाराष्ट्र महिला दशावतार प्रस्तुत महान काल्पनिक नाटक ‘विधीलेख’चा प्रयोग सादर करण्यात आला.
कोकण ही परशुरामांची पुण्यभूमी अनेक कला उदयास आल्या. दशावतार ही त्यातीलच एक कला. कोकणची ही पारंपरिक कला जतन करण्याचे कोकणातील काही महिला दशावताराच्या माध्यमातून करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ‘सिंधुरत्न फाउंडेशन प्रस्तुत ‘विधीलेख’ या महिला दशावताराचे नाट्य प्रयोग होत आहेत. श्री देव ब्राम्हणेश्वर मंदिर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधून या नाटकातील कलावंतांचा जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या नाटकातील कलाकार राजा धर्मपाल आणि ऋषी- लक्ष्मी गवस, राणी सत्यवती - साक्षी आमडोसकर, सूर्यसेन- शिवानी डिचोलकर, चंद्रसेन- मानसी कांबळे, चंद्रप्रभा- अनिशा राऊळ, वैभव- सुप्रिया पाटील आणि चित्रसेनच्या प्रमुख भूमिकेत प्रसिद्ध अष्टपैलु अभिनेत्री अक्षता कांबळी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच लेखक आणि दिग्दर्शक-प्रकाश तांबे, निर्माता सिद्देश कांबळी, हार्मोनियम-मंगेश ठाकुर, पखवाज-प्रथमेश तांबे, ताल रक्षक-सागर मेस्त्री, डीओपी-रविकिरण शिरवलकर, विशेष सहकार्य-अनुज कांबळी यांनाही सन्मानित करण्यात आले. देव ब्राह्मणेश्वर मंदिर मित्र मंडळालाही विशेष सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री देव ब्राह्मणेश्वर मंदिर मित्र मंडळाचे आयोजक, आत्माराम नाटेकर, अनिल कांबळी यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60744 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..