
उभादांडा येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
23833
वेंगुर्ले ः येथे स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आलेले बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी.
उभादांडा येथे माजी
विद्यार्थी स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २३ ः येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ आर्टसच्या १९८९च्या बॅचचा पहिला स्नेहमेळावा उभादांडा येथे झाला. १९८९ मध्ये उत्तीर्ण होऊन इतरत्र विखुरलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकत्रित करण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून या बॅचचे जयवंत नाईक, बाबा वेंगुर्लेकर, आनंद गावडे, अजित पालव, वासुदेव परब यांच्या सहकार्याने झाले. यानंतर तब्बल ३३ वर्षांनी सर्वांना एकत्रित आणून पहिला स्नेहमेळावा १४ ला उभादांडा येथील रिसॉर्टमध्ये आनंददायी व उत्साहवर्धक वातावरणात झाला. बॅ. खर्डेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी तब्बल ३३ वर्षांनी एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60752 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..