खरिपासाठी ‘कृषी’ची जोरदार तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरिपासाठी ‘कृषी’ची जोरदार तयारी
खरिपासाठी ‘कृषी’ची जोरदार तयारी

खरिपासाठी ‘कृषी’ची जोरदार तयारी

sakal_logo
By

23876
खरिपासाठी ‘कृषी’ची जोरदार तयारी

जिल्ह्याची स्थिती; ७६२५ क्विंटल बियाण्यांची मागणी, ३४०१ क्विंटल भात बियाणे प्राप्त

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२२ साठी सुधारीत ७३३५ क्विंटल व संकरित २९० क्विंटल, असे एकूण ७६२५ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. पैकी आतापर्यंत ३४०१ क्विंटल भात बियाणे प्राप्त झाले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण यांनी दिली.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना संकरित व सुधारीत भात बियाणी उपलब्ध व्हावीत, यासाठी महाबीजकड़े ४६९० क्विंटल सुधारीत व १०० क्विंटल संकरित, खासगी कंपनीकडे २४२५ क्विंटल सुधारीत व १९० क्विंटल संकरित, तर कृषी विद्यापीठ दापोली यांच्याकडे २२० क्विंटल सुधारीत असे एकूण ७६२५ क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी १६८७ क्विंटल भात बियाण्याची अधिक मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३४०१ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे, तर उर्वरित बियाणे पुढील आठवड्यात प्राप्त होणार आहे. गतवर्षी २०२१ खरीप हंगामासाठी महाबीजचे सुधारीत २०४० क्विंटल, खासगी कंपनीचे सुधारीत ३५५० क्विंटल व संकरित १३८ क्विंटल, तसेच कृषी विद्यापीठाचे सुधारीत २१० क्विंटल असे एकूण ५९३८ क्विंटल भातबियाणे मागविण्यात आले होते. यावर्षी कोठेही शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नये, यासाठी १६८७ क्विंटल अधिक भात बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणीनुसार बियाणी लवकरच उपलब्ध होतील. शेतकऱ्यांना बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावर शेतकऱ्यांकडून बियाण्यांची खरेदी सुरू झाली आहे.
---
उर्वरीत खत जून अखेरपर्यंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण १२ हजार ५०० मेट्रिक टन खत नियतन मंजूर असून, आतापर्यंत २०२८ मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. उर्वरित खत जून अखेरपर्यंत प्राप्त होईल. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी १८ हजार ५६९ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती; मात्र शासनाकडून १२ हजार ५०० मेट्रिक टन खत नियतन मंजूर झाले आहे. दरम्यान, चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासणार नाही. याबाबतचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
---
आतापर्यंत उपलब्ध खत (मेट्रिक टन)
युरिया - ७६५
‘डीएपी’ - ४५
सुपर फॉस्पेट - ३३०
पोटॅश - ३६
सुफला - ८५२
एकुण - २०२८
.............
कोट
खरिप हंगाम २०२२ साठी मागविलेल्या भात बियाण्यांमध्ये अंकुर सोनम, शुभांगी, प्रसन्न, जय श्रीराम गोल्ड, अंकुर रुपाली, सुवर्णा, जया, मसुरी, रोशनी, गायत्री, सारथी, सगुणा, पवनपुत्रा, अस्मिता, दीपरेखा यासह विविध संकरित व सुधारीत भात बियाण्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी सुधारीत व संकरित बियाण्यांचा वापर करावा.
- सुधीर चव्हाण, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60757 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top