रत्नागिरी ः प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षकांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षकांचा सन्मान
रत्नागिरी ः प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षकांचा सन्मान

रत्नागिरी ः प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षकांचा सन्मान

sakal_logo
By

प्रामाणिकपणे काम करणाऱ्‍या शिक्षकांचा सन्मान

स्नेहबंध ग्रुपच्या स्नेहसंमेलनात मान्यवरांची उपस्थिती
रत्नागिरी, ता. २३ ः राजापूर येथील अध्यापक विद्यालयाच्या १९९५-९७ बॅचच्या स्नेहबंध ग्रुपचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच झाला. ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे करताना शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्‍या शिक्षकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील निसर्गरम्य परिसरात हॉटेल ''एकांत'' मधील सभागृहात हा कार्यक्रम झाला. या बॅचचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्‍यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्‍या शिक्षकांचा फेटा बांधून तसेच शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. राजापूर हायस्कूल येथील दर्शना मांडवकर, शेतकरी पतसंस्था स्थापन करून अहमदनगर जिल्ह्यातील फाकराबाद गावचा कायापालट करणारे जालिंदर राऊत, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त परशुराम गुरव आणि खासगी शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त गणेश साळुंखे यांचा विशेष सन्मान केला गेला. तसेच स्नेहबंध ग्रुपमधील शिक्षिका मांडवकर यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
...
चौकट
पंचवीस वर्षानंतर गाठीभेटी..
या प्रसंगी सर्व शिक्षकांनी राजापूर येथील दोन वर्षाच्या कालावधीतील आठवणींना उजाळा दिला. सुमारे पंचवीस वर्षानंतर गाठीभेटी झाल्यामुळे सर्वजणांचा आनंद द्विगुणित झाला होता. मनातील आपुलकी, प्रेम, जिव्हाळा व मैत्री सर्वांनी भरभरून व्यक्त केली. यानंतर विविध गुणदर्शन व चर्चासत्र हे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. हा योग जुळवून आणण्यासाठी हरिश नांदिवडेकर, राम राठोड आणि सुनील जाधव यांनी मोलाचा हातभार लावला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60762 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..