रत्नागिरी- ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन’ पुरस्काराने रत्नदुर्गचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन’ पुरस्काराने रत्नदुर्गचा सन्मान
रत्नागिरी- ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन’ पुरस्काराने रत्नदुर्गचा सन्मान

रत्नागिरी- ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन’ पुरस्काराने रत्नदुर्गचा सन्मान

sakal_logo
By

-rat23p9.jpg
23832
ः मुंबई ः शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार आमदार अतुल भातखळकर, नीलेश देखणे, प्रवीण दीक्षित आणि रणजित सावरकर यांच्या हस्ते स्वीकारताना वीरेंद्र वणजू, शेखर मुकादम, जितेंद्र शिंदे, सनील डोंगरे, रत्नदीप नाचणकर.
-----------------
रत्नदुर्गचा ''शिखर सावरकर दुर्ग संवर्धन'' पुरस्काराने सन्मान

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक; पूरस्थितीतील कामगिरीची दखल
रत्नागिरी, ता. २३ ः चिपळूण आणि रत्नागिरी येथे गेल्या वर्षी आलेल्या भीषण पूरपरिस्थितीत ''रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स''च्या कार्याची दखल घेऊन रत्नदुर्ग संस्थेची निवड करण्यात आली. या संस्थेस स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने २०२१ चा ''शिखर सावरकर दुर्ग संवर्धन'' सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. वीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्ताने रविवारी (ता. २२) मुंबईत हा कार्यक्रम झाला.
महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक प्रदीप केळकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली कार्यरत रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स संस्था २५ हून अधिक वर्षे कार्यरत आहे. महाराष्ट्रात गिर्यारोहण संस्था आणि गिर्यारोहणातील साहसावर आधारित समाजकार्याची मोठी परंपरा आहे. अशाच सेवाभावी गिर्यारोहण संस्थांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्काराने रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स संस्थेचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी स्मारकाने तयार केलेल्या सावरकरांच्या समाजक्रांतीची यशोगाथा या लघुपटाचे लोकार्पणही करण्यात आले. या वेळी आमदार अतुल भातखळकर, ग्रुप कॅप्टन नीलेश देखणे, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष, माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर उपस्थित होते.
स्वा. सावरकर शौर्य पुरस्कार सुभेदार संतोष राळे यांना प्रदान केला. संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे अतुल राणे यांचा विज्ञान पुरस्काराने गौरव झाला. वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या वडोदरा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक केंद्राला स्मृतीचिन्ह पुरस्कार देण्यात आला. गिर्यारोहण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणारे सुशांत अणवेकर यांना शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला.
-------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60768 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..