रत्नागिरी-सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-सदर
रत्नागिरी-सदर

रत्नागिरी-सदर

sakal_logo
By

यापूर्वी १९ एप्रिल टु ३ वर लागले आहे
...
वेध वैद्यक विश्वाचा ................लोगो
-rat23p16.jpg ः
23883
डॉ. नदीम तांबोळी.
-----------------
इंट्रो
पंचकर्म ही आयुर्वेदाने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. आहारातील खाण्या-पिण्याच्या चुकांमुळे शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे रोष विकृत प्रमाणात वाढायला लागतात व ज्या दोषांचे प्रमाण शरीरात वाढते त्या दोषांशी संबंधित आजार शरीरामध्ये निर्माण होतात. शरीरात साठणारी व रोग उत्पन्न करणारी शरीरातील अशुद्धता काढून टाकण्याच्या प्रक्रियेलाच पंचकर्म असे म्हणतात. पंचकर्म म्हणजे शरीर व मन शुद्ध करण्याचा व त्या योगे आरोग्य व दीर्घायुष्य मिळवण्याचा सहज मार्ग वमन हा पंचकर्मातील महत्वाचा चिकित्सा उपक्रम आहे.
- डॉ. नदीम दि. तांबोळी, एम. डी. आयुर्वेद, रत्नागिरी
--------------------------------
वमन ः एक विशेष चिकित्सा
वमन म्हणजे शरीरात साठलेले दोष मुख्यत्वेकरून कफ, पित्त शास्त्रोक्त पद्धतीने उलटीद्वारे शरीराबाहेर काढणे होय. वर्षानुवर्षे बरेच लोक बाहेरचे खाणे, तेलकट-तिखट, गरम मसाल्याचे पदार्थ, वारंवार बेकरीचे पदार्थ खाणे, आंबट, आंबवलेले पदार्थ खाणे, भूक नसताना काहीही खाणे खात असतात. अशा कारणांमुळे शरीरातील दोष दूषित होतात व शरीरामध्ये नको असलेले घटक वाढतात. त्यामुळे बऱ्याच आजारांना निमंत्रण दिले जाते. तसेच लोकांचे व्याधीक्षमत्व कमी होणे, लगेच आजारी पडणे, वातावरण बदलेले की त्रास होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसतात. यासाठी आपल्या शरीरातील विकृत झालेले दोष कारणीभूत असतात. यासाठी हे दोष शरीराबाहेर काढून टाकणे गरजेचे असते. यासाठी आयुर्वेद शास्त्राने वमन ही एक विशेष चिकित्सा सांगितली आहे. शरीरातील नको असलेले दोष, विषारी पदार्थ उलटीद्वारे बाहेर काढले जाते, या प्रक्रियेला वमन म्हणतात.
* वमन कुणी करावे?
या उपचाराचा फायदा पुढील तक्रारी असणाऱ्या रुग्णांना होतो. कफाचे सर्व विकार, दमा, जुनाट सर्दी, घशातला चिकट कफ, डोके जड होणे, डोके दुखणे, डोळ्यांच्या तक्रारी, मान अवघडणे- जड होणे, पाळीच्या तक्रारी, अंगावर तांबडे-पांढरे अती जाणे, वजन वाढणे, थॉयरॉईडमुळे वजन वाढणे, गर्भाशयातील हार्मोनल, ह्दयविकार, रक्तदाब, पित्ताचा विकार, त्वचाविकार, सोरायसिस, इसब, गजकर्ण, पित्ताच्या गांध्या, केसांच्या तक्रारी, केस गळणे, केस पांढरे होणे, चाई पडणे, तारुण्यापिटिका, मधुमेह, अंगातील आळस जडपणा, शरीरातील रक्त अशुद्ध असणे, शुक्रदोष, वंध्यत्व हे आजार असणाऱ्या रुग्णांना वमनाची गरज असते.
* निरोगी व्यक्तींनाही वमन करता येते का?
निरोगी व्यक्तींनाही आपल्याला भविष्यात आजार होऊ नयेत, म्हणून वमन करून घेता येते. ज्या व्यक्तीच्या जेवणाच्या वेळा अनियमित आहेत, ज्यांच्या खाण्यात पिझ्झा, बर्गर, पनीर, दही, दुधाचे पदार्थ, मिठाई, मॅगी, विरुद्ध आहार, बेकरीचे पदार्थ, साऊथ इंडियन तसेच मांसाहाराचे प्रमाण अधिक आहे, अशा व्यक्तींनी दरवर्षी वमन करून घेतले पाहिजे. त्यामुळे पुढे भविष्यात होणारे आजार टाळता येतात व व्यक्ती निरोगी राहाते व आयुष्य वाढते.
* वमन केव्हा करावे?
निरोगी व्यक्तींनी वसंत ऋतूमध्ये (मार्च ते मे) वमन करता येते व ज्यांना त्रास होतो व रुग्णांकरिता वर्षभरात केव्हाही वमन करता येते.
-------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60784 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..