खेड-बचतगटांतील सात हजार महिलांना मिळाला रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-बचतगटांतील सात हजार महिलांना मिळाला रोजगार
खेड-बचतगटांतील सात हजार महिलांना मिळाला रोजगार

खेड-बचतगटांतील सात हजार महिलांना मिळाला रोजगार

sakal_logo
By

-rat23p13.jpg
L23860
ः खेड ः दीप्ती सावंत यांना गौरविताना सहाय्यक सहनियंत्रण मुल्यमापन अधिकारी मंगेश सूर्यवंशी, नाबार्डचे कुलकर्णी, एल. डी. एम पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, सहाय्यक समन्वय अधिकारी अमरिश मिस्त्री, लेखाधिकारी प्रवीण पाटील.
...
-rat23p14.jpg
2L23861
ः जिल्ह्यातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका व सहयोगिनी यांच्यासह अधिकारी वृंद.
---------------
२६० बचत गटांना साडेसात कोटीचे कर्ज वाटप!

लोकसंचलित साधान केंद्राचा गौरव; जिल्ह्यात दुसरा क्रमांक, सात हजार महिलांना मिळाला रोजगार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २३ ः लोकसंचालित साधन केंद्राच्या प्रयत्नाने ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन करण्याचे काम सुरू आहे. खेड, चिपळूण, दापोली या तीन तालुक्यात साडेपाचशे गट कार्यरत असून या गटांना त्यातून सात हजार महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. खेड तालुक्यातील २६० बचत गटांना नुकतेच व्यवसायासाठी साडेसात कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले.
या केंद्राच्यावतीने सन २००३ पासून खेडोपाड्यातील महिलांना रोजगाराच्या माध्यमातून चालना देण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. या केंद्राच्या सहयोगिनी या ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून बचत गट स्थापन करून त्यांना नामांकित बॅंकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देतात. या वर्षीच्या आर्थिक वर्षात २६० बचतगटांना चार बॅंकांच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्राच्या प्रयत्नाने साडेसात कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या केंद्राचा दुसरा क्रमांक आला आहे. त्या निमित्ताने केंद्राच्या व्यवस्थापिका दीप्ती सावंत, सहयोगिनी प्रियांका माने, समिधा पाटील, दीक्षा माने, सुप्रिया जड्याळ यांचा रत्नागिरी येथील जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला. तसेच सहाय्यक सहनियंत्रण मुल्यमापन अधिकारी मंगेश सूर्यवंशी, नाबार्डचे कुलकर्णी, एल. डी. एम. पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, सहाय्यक समन्वय अधिकारी अमरिश मिस्त्री, लेखाधिकारी प्रवीण पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
--
चौकट ः
लोकसंचालित केंद्राचा गौरव
ग्रामीण भागातील महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या मुळ प्रवाहात आणण्याच्यादृष्टीने आपण प्रयत्नशील राहिल्याबद्दल आयसीआयसीआय बॅंकेचे रिजनल मॅनेजर योगेश भट यांच्यावतीने खेड येथील लोकसंचालित साधन केंद्राला उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
----------------
कोट
बचतगटांनी उचललेल्या कर्जातून मुलांचे शिक्षण, आरोग्य व व्यवसाय या दृष्टिकोनातून हे कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खऱ्‍या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांना रोजगारभिमुख बनवण्याचा हेतू निश्‍चित साध्य होईल.
-दीप्ती सावंत, व्यवस्थापिका, लोकसंचालित साधन केंद्र

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60786 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top