चिपळूण ः धोकादायक ठिकाणी दक्षतेचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः धोकादायक ठिकाणी दक्षतेचा इशारा
चिपळूण ः धोकादायक ठिकाणी दक्षतेचा इशारा

चिपळूण ः धोकादायक ठिकाणी दक्षतेचा इशारा

sakal_logo
By

-ratchl231.jpg
23857
- चिपळूण ः तिवडी येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी आदी.
-------------
दसपटीतील धोकादायक ठिकाणी दक्षतेचा इशारा

प्रातांनी केली पाहणी; निवारा केंद्र सज्जतेच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः आगामी पावसाळ्यात आपत्ती तसेच अतिवृष्टी झाल्यास त्याचा नागरिकांना फटका बसू नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. भूवैज्ञानिकांच्या सूचनेनुसार, उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाकडून त्या-त्या विभागाला देण्यात आल्या. प्रांत व तहसीलदारांनी दसपटीतील धोकादायक ठिकाणांची संयुक्तपणे पाहणी करत त्या-त्या ग्रामपंचायतींना आपत्ती कालावधीत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्व्हेक्षणात ३२ कुटुबांचे स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आकले निबारेवाडी, ओवळी धनरवाडीतील १९ कुटुंबांना घरे बांधून देण्यात आली. यावर्षी आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी आतापासूनच खबरदारी बाळगली जात आहे.
धोकादायक ठिकाणच्या कुटुंबाचे स्थलांतराबरोबरच सरंक्षक भिंती, बांबू लागवड आदी सूचनाही केल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी उपाययोजनेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी मंडळ अधिकारी, संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक व तलाठींसमवेत कळकवणे, ओवळी, राधानगर स्वयंदेव, तिवडी, तिवरे या गावांत भेटी देऊन ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. अतिवृष्टी काळातील पूर्वतयारीबाबत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी मार्गदर्शन केले. आपत्ती काळात नागरिकांना माहिती मिळण्यासाठी काही ठिकाणी सायरन बसवण्याची सूचनाही संबंधित ग्रामपंचायतींना केल्या आहेत.
...
चौकट
निवारा केंद्रे, वीज, पाणी, स्वच्छतागृह तयार ठेवा
तिवडी ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाच्या रस्त्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्यांनतर प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित विभागाचे प्रमुख उपअभियंता माने यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तिवरे व इतर गावातील निवारा केंद्रे, वीज, पाणी, स्वच्छतागृहासह तयार ठेवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत.
---------
चौकट
कळकवणे-दादर पुलाचे काम मार्गी लावा
कळकवणे-दादर पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले. तिवरे गावात डोंगर उतारावरील पाण्याच्या प्रवाहामुळे घरांचे नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागास सूचना केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60791 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..