राजापूर-मुलींवर शिक्षणासह योग्य संस्कार करायला हवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-मुलींवर शिक्षणासह योग्य संस्कार करायला हवेत
राजापूर-मुलींवर शिक्षणासह योग्य संस्कार करायला हवेत

राजापूर-मुलींवर शिक्षणासह योग्य संस्कार करायला हवेत

sakal_logo
By

-rat23p15.jpg
23870
राजापूर ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार विद्याताई चव्हाण यांचा सत्कार करताना सोल्ये बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण, राजापूर तालुका बौद्धजन संघाचे पदाधिकारी.
-------------
मुलींवर शिक्षणासह योग्य संस्कार करायला हवेत

माजी आमदार विद्याताई चव्हाण यांचे मत; सोल्येत गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः ''बुद्धांनी सांगितलेली समता प्रस्थापित करायची असेल तर स्त्रियांनी स्वतःसह आपल्या मुलींना शिक्षण आणि ज्ञानाच्या दिशेने झेपावण्यास योग्य संस्कार करायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केले.
तालुक्यातील सोल्ये बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण व राजापूर तालुका बौद्धजन संघ गट क्र. ११ च्या संयुक्त विद्यमाने नुकतीच बौद्ध पौर्णिमा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी संविधान अभ्यासक विशाल हिवाळे, तहसीलदार शीतल जाधव, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री, प्रतिष्ठित नागरिक शशिकांत प्रभूदेसाई, पोलिस पाटील विजय प्रभुदेसाई, अरुण शिंदे, भारती पाटणकर, जीवन तांबे आदी उपस्थित होते.
संविधान अभ्यासक विशाल हिवाळे यांनी दारिद्र्य, विषमता, शोषण, वर्णव्यवस्था, हिंसा आदी विकृतीविरोधात तथागत् बुद्धाची लढाई होती, असे विचार मांडले. यानिमित्ताने विजेवर चालणारी पहिली कोकण रेल्वेची गाडी चालवण्याचा मान पटकावणारे सोल्येचे सुपुत्र प्रणय तांबे, कोरोना महामारीच्या काळात गरिब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, औषधे वाटप करणारे दाम्पत्य पत्रकार जीवन तांबे व प्रा. स्वानंदी तांबे यांचा माजी आमदार श्रीमती चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी पोलिस अधिकारी अशोक तांबे, माजी अध्यक्ष अनंत तांबे, राज सोलकर, संजय कदम यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60793 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..