चिपळूण-नागरी सुविधा केंद्रात होणार दरडग्रस्तांचे स्थलांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-नागरी सुविधा केंद्रात होणार दरडग्रस्तांचे स्थलांतर
चिपळूण-नागरी सुविधा केंद्रात होणार दरडग्रस्तांचे स्थलांतर

चिपळूण-नागरी सुविधा केंद्रात होणार दरडग्रस्तांचे स्थलांतर

sakal_logo
By

२३ पी २४
L23899
चिपळूणः गाणे खडपोलीतील नागरी सुविधा केंद्रात दरडग्रस्तांचे स्थलांतर केले जाणार आहे.
-------------
अतिवृष्टीच्या काळात दरडग्रस्तांचे होणार स्थलांतर

दसपटी विभाग धोक्याखाली; काहींना आधीच सूचना, नागरी सुविधा केंद्र निश्चित
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः अतिवृष्टीच्या काळात दसपटी विभागातील दरडग्रस्तांना खडपोली एमआयडीसीतील नागरी सुविधा केंद्रात स्थलांतरित केले जाणार आहे. येथील प्रांताधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
चिपळूण तालुक्यातील दसपटी विभाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका याच भागात आहे. गतवर्षी २२ जुलैच्या महापुरात या भागातील दादर, कळकवणे, तिवडी, नांदिवसे, रिक्टोली भागात दरडी कोसळल्या. अनेकांच्या घराचे आणि शेतीचे नुकसान झाले. दादर, कळकवणे पूल वाहून गेल्यामुळे या भागाकडे जाणारा खडपोली, दादर, कळकवणे, नांदिवसे मार्ग बंद झाला होता. दसपटीतील अनेक गावे पंधरा दिवस संपर्काच्या बाहेर होती. तुटलेल्या कोणाच्या ठिकाणी मातीचा भराव टाकून दादर-कळकवणे मार्ग सुरू करण्यात आला. रस्त्यावर आलेली दरड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून मार्ग सुरू करण्यात आले. परंतु संपूर्ण पावसाळ्यात येथील ग्रामस्थ दरडी कोसळण्याच्या शक्यतेने भयभीत होते. पावसाळा संपल्यानंतर प्रशासनाकडून अनेक उपाययोजना सुरू झाल्या. आता पावसाळा तोंडावर असल्यामुळे आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.
...
चौकट
धोकादायक घरे आणि वाड्या शोधल्या..
दसपटीतील धोकादायक घरे आणि वाड्या प्रशासनाकडून शोधण्यात आल्या आहेत. त्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी ग्रामस्थांनी स्वतःहून स्थलांतरित व्हावे, अशा सूचनाही काहींना देण्यात आले आहेत. मोठे नैसर्गिक संकट निर्माण झाले तर दरडग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने खडपोली येथील एमआयडीसीचे नागरी सुविधा केंद्र हे ठिकाण निश्चित केले आहे.
...
चौकट
एमआयडीसीचे नागरी सुविधा केंद्रही
वालोटी फाटा येथे एमआयडीसीचे नागरी सुविधा केंद्र आहे. याठिकाणी दोनशे लोकांची एका ठिकाणी राहण्याची तात्पुरती व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून एमआयडीसीच्या नागरी सुविधा केंद्राची दरडग्रस्तांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी निवड केली आहे.
-----------
कोट
चिपळूण तालुक्‍यात सर्वाधिक दरडी कोसळण्याचा धोका पूर्व विभागाला आहे. येथील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी खडपोली येथील एमआयडीसीच्या नागरी सुविधा केंद्राची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय अन्य शासकीय इमारतींमध्ये दरडग्रस्तांची तात्पुरती राहण्याची सोय केली जाणार आहे.
-तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार, चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60806 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..